ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

विषयाचे मर्म दाखविण्याचे कार्य व्यंगचित्र करते - वामनराव तुरिले

भंडारा, दि. १७ (महान्यूज) - व्यंगचित्र हे विषयाचा मर्म दाखविण्याचे महत्त्वाचे कार्य करते. त्याचित्रातून घटनेची अभिव्यक्ती स्पष्ट होते. सामान्य मानसाला सुध्दा या व्यंगचित्रातून विषयाचा सरळ सोपा अर्थ कळणे शक्य होते, असे मत ज्येष्ठ पत्रकार वामनराव तुरिले यांनी व्यक्त केले. 

राष्ट्रीय पत्रकार दिनाचा कार्यक्रम जिल्हा माहिती कार्यालयात साजरा करण्यात आला. यावेळी अभिव्यक्तीचे माध्यम म्हणून व्यंगचित्र व अर्कचित्र कलेचे महत्त्व आणि प्रभाव या विषयावर माहिती देताना श्री. तुरिले बोलत होते. 

ज्येष्ठ पत्रकार रमेश सुपारे म्हणाले की, व्यंगचित्र हे अभिव्यक्तीचे बोलके माध्यम आहे. कमीतकमी शब्दात अभिव्यक्त करण्याची कला व्यंगचित्रामध्ये आहे. व्यंगचित्रातून आपले विचार जनतेपर्यंत पोहचविता येतात. व्यंगचित्र हे माहिती देण्याचे काम करते. तसेच छोट्याशा व्यंगचित्रातून न लिहिताही मोठा संदेश लोकांपर्यंत पोहचविता येतो. व्यंगचित्र हा वर्तमानपत्राचा मोठा दागिना आहे. 

यावेळी ज्येष्ठ पत्रकार वामनराव तुरिले यांनी वयाचे पंच्याहत्तर वर्षात पर्दापणानिमित्त कार्यालयातर्फे शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण, बाळासाहेब ठाकरे, उन्नीकृष्णन, मनोहर सप्रे आदी व्यंगचित्रकारांविषयी चर्चा करण्यात आली. समस्येला वाचा फोडण्याचे मोठे सामर्थ्य व्यंगचित्रात असते. यावेळी गोपू पिंपळापूरे, विजय खंडेरा यांची समयोचित भाषणे झालीत. 

कार्यक्रमाला दीपक फुलबांधे, नरेश बोपचे, इंद्रपाल कटकवार, दीपक रोहणकर, राजु मस्के, अनिल आकरे, दीपेंद्र गोस्वामी, देवानंद नंदेश्वर, रवी खोब्रागडे, समीर नवाज, विलास केजरकर, सुरेश फुलसुंगे आदी पत्रकार उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे यांनी केले.