ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

आईनेच दिली मुलाच्या हत्येची सुपारी

नागपूर, दि. १८ (प्रतिनिधी) - दारूडय़ा मुलाच्या त्रासाला कंटाळून जन्मदात्या आईनेच त्याची गुडांकरवी हत्या घडवून आणल्याचा धक्कादायक प्रकार नागपूर येथे उघडकीस आला. याप्रकरणी पोलिसांनी त्याच्या आईसह चारही आरोपींना अटक केली आहे.

महेश वासनिक, असे हत्या झालेल्या दारूडय़ा मुलाचे, तर लताबाई वासनिक असे अटक केलेल्या त्याच्या आईचे नाव आहे. नागपूरच्या लोखंडेनगर भागात लताबाई मुलगा महेशसोबत वास्तव्यास आहेत. महेशला दारूचे व्यसन असल्याने तो नेहमी आईकडे दारूसाठी पैशाची मागणी करायचा. पैस न दिल्यास शिवीगाळ आणि मारहाणही करीत असे. सहा महिन्यांपूर्वी त्याने पैशासाठी आईला बेदम मारहाण केली होती. त्यात गंभीर दुखापत झाल्याने लताबाई यांना रूग्णालयात दाखल करावे लागले होते. अखेर महेशच्या सततच्या त्रासाला कंटाळून लताबाई यांनी चार गुंडांना त्याच्या हत्येची सुपारी दिली.

त्यानंतर लोखंडे नगर परिसरात राहणाऱ्या भौतिक, अंकेश मंडलेकर आणि रवि पटेल या तिघांनी महेशला दारूच्या नशेत गाठले आणि त्याची गळा दाबून हत्या केली. शवविच्छेदन अहवालात महेशची हत्या झाल्याचे स्पष्ट झाले. तसेच हत्या झाल्याच्या दिवशी लताबाई आणि तिघा मारेकऱ्यांमध्ये मोबाईलवरून संभाषण झाल्याचे उघड झाल्यानंतर पोलिसांनी लताबाईसह याप्रकरणातील चारही आरोपींना बेडय़ा ठोकल्या.