ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

एक हजार ८६० शेतकऱ्यांची सावकाराच्या जाचातून सुटका

वर्धा २५ (प्रतिनिधी) - शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकाराकडून घेतलेल्या संपूर्ण कर्ज माफ करण्याच्या निर्णयामुळे जिल्ह्यातील १ हजार ८६० शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे. शेतकऱ्यांच्या सावकाराकडील २ कोटी ४९ लाख ५३ हजार ६४९ रुपयांचे कर्ज माफ झाले आहे.

परवानाधारक सावकाराकडून शेतकऱ्यांनी शेतीसाठी घेतलेल्या कर्जाच्या माफीच्या शासनाच्या निर्णयाचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून सावकराकडे कर्जासाठी गहाण ठेवलेल्या मौल्यवान वस्तूसह शेती व इतर मालमत्ता त्यांना परत मिळाली आहे. परवानाधारक सावकाराने शेतकऱ्यांना दिलेले कर्ज शासनाच्या या निर्णयामुळे सावकारांच्या खात्यात थेट जमा झाले आहे.

परवानाधारक सावकाराकडून कर्जमाफ करण्याच्या निर्णयानुसार तालुकास्तरावर समितीतर्फे परवानाधारक सावकाराकडून घेतलेल्या कर्जासंबंधी माहिती संकलित करून संबंधीत तहसीलदाराकडून छानणी केल्यानंतर जिल्हास्तरीय समितीतर्फे सावकारी कर्ज प्रकरणे मंजूर करण्यात येतात. जिल्ह्यात झालेल्या पहिल्या बैठकीत ४५४ शेतकऱ्यांचे ५२ लाख ४ हजार १६० रुपयांचे तसेच दुसऱ्या बैठकीत १ हजार ६५ कर्जदार शेतकऱ्यांची १ कोटी ५६ लाख १० हजार १८४ रुपयांचे कर्ज माफ करण्यात आले होते. तसेच मंगळवारी झालेल्या तिसऱ्या बैठकीत ३४१ शेतकऱ्यांकडे असलेले ३२ लाख ३९ हजार ३०५ शेतकऱ्यांकडे असलेले कर्ज माफ करण्यात आले, असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.