ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

आयुर्वेदशास्त्राला विकसीत करण्यासाठी प्रयत्न करू - सुधीर मुनगंटीवार

यवतमाळ, दि. २५ (प्रतिनिधी) - ॲलोपॅथीच्या मर्यादा जेथे संपतात तेथे आयुर्वेद उपचार सुरू होतो. आयुर्वेदात मोठी ताकद आहे. आयुर्वेदीक औषधांसाठी मोठी वनसंपदा आपल्याकडे उपलब्ध आहे. त्यामुळे शासन वनौषधींचा उपयोग करून आयुर्वेदाला विकसीत करण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

आयुर्वेद महाविद्यालयात सुरू करण्यात आलेल्या पंचकर्म चिकित्सालयाचे उद्घाटन श्री.मुनगंटीवार यांच्याहस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री संजय राठोड, आमदार मदन येरावार, आयुष संचालनालयाचे संचालक कुलदीप कोहली, आयुर्वेद सेवा समितीचे अध्यक्ष डॅा.केदार राठी, डॉ.सुरेंद्र पद्मावार, डॉ.राजीव मुंदाने आदी उपस्थित होते. 

पंचकर्म चिकित्सालयाचा उपयोग प्रत्येकाचे आरोग्य निरोगी आणि आयुष्यदायी करण्यासाठी व्हावा, असे सांगून ते म्हणाले, आयुर्वेदासाठी लागणारी वनौषधी मोठ्या प्रमाणावर राज्यातील वनांमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळेच काही महिन्यांपूर्वी वनधन विक्री केंद्र शासनाने सुरू केले. येत्या काळात वनौषधींपासून राज्यात ५०० कोटींचा व्यवसाय होईल. जगातील अनेक देशांमध्ये आयुर्वेद पोहोचले आहे. आयुर्वेद भारताची देण आहे. भविष्यात या शास्त्राचा प्रचंड उपयोग होणार आहे. देशी पद्धतीची वनौषधी स्वस्तात उपलब्ध करून या पद्धतीने चांगला उपचार देण्याचा राज्याचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.