ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

संविधानाच्या अधिन राहून महाराष्ट्राला प्रगतशील राज्य बनविणार - मुख्यमंत्री

नागपूर, दि. २७ (प्रतिनिधी) - संविधानाच्या अधिन राहून महाराष्ट्राला एक उत्तुंग राज्य बनविण्याचा प्रयत्न करील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

1 लाख 25 विद्यार्थ्यांसह खचाखच भरलेल्या यशवंत स्टेडियममध्ये मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामुदायिक वाचन केले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्याय व विशेष सहाय मंत्री राजकुमार बडोले, राज्यमंत्री दिलीप कांबळे, जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर, सिने अभिनेते सिद्धार्थ जाधव, भारत गणेशपुरे, प्राजक्ता माळी, श्रीमती निशा परुळेकर, महापौर प्रवीण दटके, सर्वश्री आमदार सुधाकर देशमुख, डॉ. मिलींद माने, कृष्णा खोपडे, नागो गाणार, अनिल सोले, सुधाकर कोहळे, विकास कुंभारे, नागपूर विद्यापीठाचे कुलगुरु सिद्धार्थ विनायक काणे, माजी राज्यमंत्री सुलेखा कुंभारे, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव उज्ज्वल उके, समाज कल्याण आयुक्त पियुष सिंह, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, आदिवासी विभागाच्या अपर आयुक्त माधवी खोडे, मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी जोंधळे आदी उपस्थित होते.

विद्यार्थी व उपस्थित पाहुण्यांनी एका बुलंद आवाजात उद्देशिका वाचून परिसर दणाणून सोडला. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद ओसंडून वाहत होता. भारतीय संविधान हा एक पवित्र ग्रंथच आहे. या भावनेने ते भारावून गेले होते.

मुख्यमंत्री म्हणाले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला जगातले एक उत्तम संविधान दिले. या संविधानाने भारतातल्या प्रत्येक नागरिकाला जगण्याचा हक्क दिला. आज भारत विविध क्षेत्रात जी प्रगती करीत आहे, त्यामागे भारतीय संविधान आहे. हे विसरुन चालणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीचे औचित्य साधून संविधानातील उद्देशिका वाचण्याचा उपक्रम सामाजिक न्याय विभागाने आयोजित केला. त्यांनाही मी धन्यवाद देतो.

श्री.बडोले म्हणाले, डॉ. बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून देशाला मोठे योगदान दिले आहे. संविधानामुळे गोरगरीब, आदिवासी, सामान्य माणसाला जगण्याचा मार्ग दिला असून प्रत्येकाला अभिमान वाटेल असे काम संविधानाच्या माध्यमातून होत आहे. संविधानाच्या माध्यमातून लोकशाही प्रगल्भ होत आहे. देशात समता, स्वातंत्र्य व बंधुत्व या माध्यमातून देशाची वाटचाल सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल असे इंदू मिल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारणीस मान्यता व लंडनमधील डॉ. आंबेडकरांचे घर खरेदी करुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे नाव संपूर्ण जगात केले. याची नोंद इतिहासात नक्की होईल, असेही त्यांनी सांगितले.

श्री. कांबळे आभार मानताना म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून देशातील गोरगरीब आदिवासी सर्वसामान्य माणसाला जगण्याची उमेद दिली आहे.

यावेळी श्री. उके, श्री. सिंह यांचेही समयोचित भाषण झाले. सूत्रसंचालन प्रा. माधुरी यावलकर यांनी केले. समाज कल्याण विभागाचे आयुक्त माधव झोड, सहायक आयुक्त मंगेश वानखेडे, गायकवाड, प्रमोद पेंडके, चंदू पेडके, संजय भेंडे, मीडिया वेव्हचे अजय राजकारणे, बार्टीचे महासंचालक डी. आर. परिहार उपस्थित होते.