ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

अमरावती जिल्ह्यात दुग्ध व्यवसाय वाढीस चालना

अमरावती, दि. २७ (प्रतिनिधी) - जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी, अमरावती या कार्यालयामार्फत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या दुधाला बाजारपेठ उपलब्ध करुन देणे, त्यांच्या दुधाला हमीभाव देऊन दूध देयकांची अदायगी वेळोवेळी करणे तसेच नविन दूध उत्पादक सहकारी संस्था स्थापन करणे, दुधाअभावी बंद असलेल्या संस्थांचे पुनरुज्जीवन करणे इत्यादी कामे केली जातात.

सद्य:स्थितीत शासकीय दूध योजना, अमरावती येथे जिल्ह्यातील ग्रामीण भागामधून दूध उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पादित केलेले दूध प्राथमिक दूध उत्पादक सहकारी संस्थांमार्फत जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघ मर्यादित अमरावती यांचेमार्फत दैनंदिन सहा हजार लिटर संकलीत होत आहे. तसेच प्रहार तालुका महिला दूध उत्पादक सहकारी मर्यादित, चांदुर बाजारमार्फत दोन हजार लिटर प्रतिदिन दूध संकलित होत आहे. संकलित झालेल्या दुधापैकी दैनंदिन तीन हजार ते साडे तीन हजार लिटर दूध मागणीप्रमाणे स्थानिक बाजारपेठेत ग्राहकांना शासनामार्फत गायीचे दूध (आरे ब्रँड) अंतर्गत रास्त दरामध्ये उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना पूरक व्यवसाय म्हणून दुग्धव्यवसाय वाढीच्यादृष्टीने शासनामार्फत वेळोवेळी संस्थास्तरावर भेटी व मार्गदर्शन करण्यात येत असून बंद असलेल्या संस्था सुरु करणे व अवसायनातील संस्थांचे पुनरुज्जीवन करण्याकरीता क्षेत्रीय कर्मचाऱ्यांमार्फत प्रयत्न सुरु आहे. दुग्धव्यवसायाला चालना देण्यासाठी जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे दुग्धव्यवसायाचे तांत्रिक ज्ञान अवगत व्हावे. तसेच प्रगत भागातील दुग्ध व्यवसाय संबंधित व्यवस्थापन, दुग्धजन्य पदार्थ निर्मितीचे ज्ञान अवगत होऊन त्यांचेमार्फत सुरु असलेल्या पांरपारिक पूरक व्यवसायाला गती मिळेल. दुग्धव्यवसायाकडे जास्तीत जास्त शेतकरी आकर्षित झाल्यास जिल्ह्यातील दुग्ध उत्पादन वाढीस चालना मिळेल. दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रशिक्षण कार्यक्रम, संस्था बळकटीकरण व स्वच्छ दूध निर्मितीकरिता विदर्भातील आपद्ग्रस्त 6 जिल्हे व मराठवाड्यातील 8 जिल्हे असे एकूण 14 जिल्ह्याकरीता रुपये 2379.60 लक्ष चा प्रस्ताव दुग्धव्यवसाय खात्यामार्फत शासनास सादर करण्यात आला आहे. यातून दूध उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण होऊन त्यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे.