ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

भाजपच्या आणखी एका आमदारास तीन महिने कारावास

पांढरकवडा (जि. यवतमाळ), दि. २८ (प्रतिनिधी) - वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात जाऊन तेथील सहायक लेखापालास धमकी दिल्याप्रकरणी भाजप आमदार राजू नारायण तोडसाम यांना केळापूर येथील न्यायालयाने तीन महिने कारावास आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. तोडसाम हे पांढरकवडा-आर्णी मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडून आले आहेत. 

राजू तोडसाम हे १७ डिसेंबर २०१३ रोजी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या पांढरकवडा उपविभागाच्या कार्यालयात वीज देयकाबाबत चौकशीसाठी गेले होते. त्या वेळी तोडसाम यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली. आकोत या अधिकाऱ्यांची कॉलर पकडून त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे आकोत यांनी पांढरकवडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून आमदार राजू तोडसाम यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम ३५३, २९३ व ५०६ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला होता. 
 
या प्रकरणाच्या सुनावणीनंतर तक्रारदार विलास आकोत यांच्यासह १० जणांच्या साक्षी ग्राह्य धरून सहदिवाणी न्यायाधीश व प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी एच. ए. वाणी यांनी आमदार राजू तोडसाम यांना ३ महिने कारावास व १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. 

महिनाभरापूर्वीच भाजपचे आमदार सुधीर पारवे यांनाही न्यायालयाने शिक्षकाला मारहाण केल्याप्रकरणी तीन महिन्यांचा कारावास सुनावला आहे. मात्र त्याविरोधात पारवे यांनी उच्च न्यायालयातून जामीन मिळवला आहे.