ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

आधुनिक तंत्र प्रणालीमुळे गुन्ह्यांच्या प्रमाणात घट होणार - मुख्यमंत्री

नागपूर, दि. ३० (प्रतिनिधी) - पोलीस गुन्हा घडलेल्या ठिकाणी किती वेळात पोहोचतो, याला महत्त्व आहे. आधुनिक तंत्र प्रणालीमुळे आता हे सहज शक्य होणार आहे. मुंबईनंतर नागपुरात नवीन यंत्रणा सुरु होत असल्यामुळे गुन्हेगारांवर वचक बसणार आहे. सोबतच प्रत्येक कॉल ट्रॅक होणार असल्यामुळे खोट्या तक्रारीनांही आळा बसेल व योग्य तक्रारीच्या ठिकाणी पोलिसांना लवकर पोहोचता येईल. या यंत्रणेमुळे पोलिसांची कार्यक्षमता वाढण्यास निश्चितपणे मदत होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. 

नागपूर पोलीस नियंत्रण कक्षाच्या डिसीआरएमएस डायल 100 या यंत्रणेचे उद्घाटन व गस्ती वाहनांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा झेंडा दाखवून आज शुभारंभ केला. यानंतर झालेल्या समारंभात मुख्यमंत्री बोलत होते. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून खासदार विजय दर्डा, महापौर प्रवीण दटके, आमदार सुधाकर देशमुख, प्रकाश गजभिये, विभागीय आयुक्त अनूप कुमार, नासुप्रचे सभापती श्याम वर्धने, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर उपस्थित होते.

शहरात गुन्हे घडत असताना पोलिसांचा प्रतिसाद किती वेळात मिळतो यावर पोलिसांची कार्यक्षमता अवलंबून असते. केवळ संख्याबळ वाढवून गुन्हे कमी होणार नाही. तर आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करुन ते किती लवकर आटोक्यात आणता येईल यावर पोलिसांचे यश अवलंबून आहे. घडलेल्या गुन्ह्यांचा तपास, पुरावे आणि कोर्टाने दिलेली शिक्षा या तीन बाबींवर राज्य सरकार विशेष लक्ष देणार आहे. यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी आवर्जून सांगितले.

मुंबईत सीसीटीव्ही नेटवर्कचे 1200 कॅमेरे लावण्यात आले असून त्याचे लोकार्पण उद्या आहे. सीसीटीव्हीचा प्रलंबित प्रश्न शासनाने तातडीने सोडवून आठ महिन्यात सीसीटीव्ही कॅमेरे पहिल्या टप्प्यात लावण्यात आले आहेत. ऑक्टोबर 2016 पर्यंत संपूर्ण मुंबई शहरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येतील. यामुळे गुणात्मक परिवर्तन पोलिस विभागात दिसेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले. 

नागपुरातही लवकर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची योजना आखण्यात येत आहे. यासंदर्भात पालकमंत्री बावनकुळे यांनी बैठका घेवून निधी उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही सुरु केली आहे. नवीन पोलिस ठाणे उभारताना त्यांना तातडीने जागा मिळवून देण्याची कार्यवाही करण्यात येईल. तसे प्रस्ताव शासनाला प्राप्त झाले आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या भाषणात जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून एक कोटी रुपये ग्रामीण पोलिसांना व एक कोटी रुपये नागपूर शहर पोलिसांना नवीन पोलिस स्टेशन उभारणी व नवे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी देण्यात येणार असल्याचे सांगून नव्याने स्थापन झालेल्या पोलिस स्टेशनसाठी नागपूर सुधार प्रन्यासने इमारतीची उभारणी तातडीने करुन द्यावी, अशी सूचना केली. 

नागपूर शहर हे एक प्रगत शहर म्हणून विकसित होत आहे. अशा वेळी या शहरातील नागरिकांची सुरक्षाही महत्त्वाची आहे. सामान्य नागरिकांच्या तक्रारीची दखल पोलिसांनी तातडीने घेण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करावा. यासाठी शासनाकडून जी मदत आवश्यक आहे ती निश्चितपणे करण्यात येईल असे आश्वासनही पालकमंत्र्यांनी यावेळी दिले. 

प्रास्ताविक भाषणात पोलिस आयुक्त एस.पी. यादव म्हणाले की, नागपूर पोलिस नियंत्रण कक्षात Distrees Call Report Management System अर्थात Dcrms उपलब्ध झाल्यामुळे पोलिसांची कार्यक्षमता वाढणार आहे. त्यामुळे जनतेला अधिक गुणात्मक सेवा देणे सुलभ होणार आहे. यापूर्वी नियंत्रण कक्षाकडे केवळ दहा लाईन्स असल्याने वाढत्या कामकाजासाठी त्या अपूर्ण होत्या. आता वीस लाईन्समुळे अधिक व्यापक व तत्पर सेवा देणे शक्य होणार आहे. त्यामुळे कॉल ड्रॉपचे प्रमाण शून्यावर येईल. त्यासाठी बसविण्यात आलेल्या विशेष सॉफ्टवेअरमुळे सर्व कॉल्सचा अहवाल प्राप्त होणार आहे. या यंत्रणेला जोडलेल्या व्हिडिओ मॉनिटर सुविधेमुळे शंभर क्रमांकावर येणारे कॉल आवश्यक तपशीलासह प्रदर्शित होणार आहेत. शहरातील सर्व 24 पोलिस स्टेशन क्षेत्रात प्रत्येकी चार या प्रमाणे गस्ती वाहने उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या वाहनांवर बसविलेली यंत्रणा संबंधित कर्मचारी बंद अथवा निकामी करु शकणार नाही, असे सांगितले.

सुरुवातीला मुख्यमंत्र्यांनी डीसीआरएमएस यंत्रणेचे फीत कापून उद्घाटन केले. नियंत्रण कक्षात बसून त्यांनी ही यंत्रणा कशाप्रकारे काम करेल याची माहिती घेतली. तसेच गस्ती वाहनांना हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. पाहुण्यांचे स्वागत पोलिस आयुक्त एस.पी. यादव, उपायुक्त दीपाली मासिलकर, अतिरिक्त आयुक्त श्रीकांत तरवटे, इसु सिद्धू यांनी केले. आभार पोलिस सहआयुक्त राजवर्धन यांनी मानले.