ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

ज्येष्ठ नागरिक धोरणाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणार - देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि. ३० (प्रतिनिधी) - वाढते शहरीकरण आणि परिवारातील विभक्तपणामुळे ज्येष्ठ नागरिकांसमोर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्यात 2013 मध्ये जाहीर करण्यात आले असले तरी या धोरणासंदर्भात शासन निर्णय न निघाल्यामुळे अंमलबजावणी होऊ शकली नाही. ज्येष्ठ नागरिकांना विविध सुविधा संदर्भात विविध विभागाकडून त्वरित शासन निर्णय काढण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

संजीवन सोशिओ-मेडीकल फाऊंडेशनच्या आमगाव (देवरी) येथील संजीवन वृद्धाश्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली. तसेच भाग्यश्री स्मृती वृद्ध सहनिवास व स्व. अशोक वाडीभस्मे स्मृती दालनाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार कृपाल तुमाने, आमदार सुधाकर देशमुख, संस्थेचे प्रमुख डॉ. संजय उगेमुगे आदी उपस्थित होते.

श्री. फडणवीस म्हणाले, भारतीय संस्कृतीमध्ये परिवार तसेच आई-वडिलांना अत्यंत महत्त्वाचे स्थान दिले असले तरी परिवारातील विभक्तपणामुळे व शहरीकरणामुळे ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न निर्माण झाले आहे. या प्रश्नासंदर्भात समाजानेच प्रभावी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. ज्येष्ठ नागरिकांना वाऱ्यावर सोडून न देता त्यांच्या सेवेचे व्रत संजीवन या संस्थेने लोकसहभागातून सुरु केले आहे. संजीवनच्या निसर्गरम्य वातावरणात महात्मा गांधी यांना अभिप्रेत असलेल्या ग्रामोविज्ञानाच्या सर्वच संकल्पना साकारल्या असल्यामुळे येथून समाजाला नवी दिशा देण्याचे कार्य होत आहे. 

पालकमंत्री यांनी यावेळी संजीवन या संस्थेच्या कामाचा गौरव केला. प्रारंभी देवेंद्र फडणवीस यांनी वृद्धाश्रम परिसरातील शिवालय, वृद्धांसाठी असलेले कुटीर, संजीवन गोशाळा, अपारंपारिक ऊर्जा आणि पर्यावरण प्रकल्प, संजीवन हॉस्पिटल तसेच विविध विकास प्रकल्पांना भेट देऊन माहिती घेतली. 

डॉ. संजय उगेमुगे यांनी देखील विचार व्यक्त केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजीवनतर्फे सुरु असलेल्या विविध उपक्रमाबद्दल माहिती घेतली. यावेळी माजी मंत्री रमेशचंद्र बंग, माजी आमदार विजय घोडमारे, विभागीय आयुक्त अनूप कुमार, मुख्यमंत्र्यांचे सचिव प्रवीण दराडे, नासुप्रचे सभापती श्याम वर्धने, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे आदी उपस्थित होते.