ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

बारा दिवसांतच हिवाळी अधिवेशन गुंडाळणार

नागपूर, दि. ३ (प्रतिनिधी) - अवघ्या १२ दिवसांतच युती सरकार नागपुरातून पळ काढणार आहे. विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन केवळ १२ दिवसांचे असेल, हे आता स्पष्ट झाले आहे. ७ डिसेंबरला अधिवेशन सुरू होत आहे आणि २३ डिसेंबरला सूप वाजेल.

पहिल्या दिवशी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रमोद शेंडे आणि इतर मान्यवरांना श्रद्धांजली वाहिली जाईल. २२ तारखेला अंतिम आठवडा प्रस्ताव आहे. २३ डिसेंबरला सरकारी विधेयक सादर करून सरकार निरोप घेईल. संपूर्ण अधिवेशनात सरकारी कामकाजावर भर दिसतो आहे. असे झाले तर मग विदर्भाच्या प्रश्नांवर चर्चा करायला अपुरा वेळ मिळणार आहे.

युती सरकारचे नागपूरचे हे दुसरे अधिवेशन आहे. काँग्रेस आघाडीच्या १५ वर्षाच्या राज्यातही नागपूर अधिवेशन तीन आठवडय़ांत गुंडाळले जात होते.

२००० साली नागपूर अधिवेशन सर्वाधिक म्हणजे १५ दिवस चालले. बहुतेक वेळा १२ दिवसांत अधिवेशन गुंडाळलेले दिसते. आघाडी सरकारच्या १५ वर्षात आठ वेळा अधिवेशन केवळ दोन आठवडे म्हणजे १० दिवस चालले.

२००२ साली तर हे अधिवेशन केवळ आठ दिवस चालले. यंदा काँग्रेस आक्रमक असल्याने अधिवेशनात वाढ होऊ घातली आहे.