ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

वर्षपूर्तीनिमित्तच्या चित्ररथास पालकमंत्र्यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सुरु

अमरावती, दि. ५ (प्रतिनिधी) - अमरावती जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने शासनाने घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयावर आधारित चित्ररथाचे आयोजन करण्यात आले असून पालकमंत्री प्रविण पोटे पाटील यांनी चित्ररथास हिरवी झेंडी दाखवून शुभेच्छा दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आयोजिलेल्या कार्यक्रमास जिल्हाधिकारी किरण गित्ते, पालकमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक रविंद्र धुरजड, निवासी उपजिल्हाधिकारी मोहन पातुरकर, विशेष कार्य अधिकारी अनिल भटकर, अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी चित्ररथावर जलयुक्त शिवार, धडक सिंचन, राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना, कर्जमुक्ती धोरण, प्रधानमंत्री मुद्रा बँक योजना, उद्योग, रेशीम विकास, नैसर्गिक आपत्तीत शासनाची मदत, पीक वीमा, महाराजस्व अभियान, सेवा हमी कायदा, जिल्हा नियोजन समिती, प्रधानमंत्री जनधन योजना अंतर्गत झालेल्या कामाची सचित्र माहिती प्रदर्शित करण्यात आली असल्याचे सांगितले. 

यावेळी पालकमंत्र्यांनी चित्ररथाची पाहणी केली. श्रीफळ फोडून तसेच हिरवी झेंडी दाखवून चित्ररथाला शुभेच्छा दिल्या.

प्रारंभी, जिल्हा माहिती अधिकारी सुरेश काचावार यांनी पालकमंत्री श्री.पोटे यांचे तसेच जिल्हाधिकारी किरण गित्ते व उपस्थित अधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. वर्षपूर्तीनिमित्त जिल्ह्यात घेण्यात येत असलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली. या चित्ररथासोबतच कलापथकाचे ही आयोजन करण्यात आले असून पालकमंत्री महोदयांपुढे गंधर्व बहुउद्देशिय संस्था, अमरावती यांच्या वतीने शासनाच्या योजनांवर आधारित कलापथक सादर करुन मंत्रीमहोदयांचे मन जिंकले. तरुण कलाकारांनी सादर केलेल्या कलापथकाबद्दल श्री.पोटे यांनी दिपक नांदगावकर व सर्व कलाकारांचे कौतुक करुन शुभेच्छा दिल्या. सर्व योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचविण्याचे आवाहन केले.

वर्षपूर्तीनिमित्त निर्माण करण्यात आलेल्या चित्ररथासाठी जिल्हा माहिती कार्यालयातील शैलजा वाघ-दांदळे, नितीन खंडारकर, विजय राऊत, रमेश बारस्कर, योगेश गावंडे, दिनेश धकाते, सागर राणे, सुरेश राणे, गणेश वानखडे, हर्षराज हाडे, दिपाली ढोमणे, देविदास जोशी यांनी परिश्रम घेतले.