ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

विधानमंडळाच्या समित्या या संसदीय कामकाजाचा आत्मा - अशोक मोहिते

नागपूर, दि. १० (प्रतिनिधी) - राज्य शासनाच्या कामकाजावर नियंत्रण
ठेवण्याचे अत्यंत महत्वाचे कार्य विधानमंडळाच्या विविध समित्यांमार्फत केले जाते. या समित्या संसदीय कामकाजाचा आत्मा आहेत, असे प्रतिपादन विधानमंडळाचे सहसचिव अशोक मोहिते यांनी केले.

विधानभवन येथे राष्ट्रकुल संसदीय मंडळामार्फत सुरु असलेल्या संसदीय अभ्यासवर्गात आज त्यांचे व्याख्यान झाले, त्यावेळी ते बोलत होते. या वेळी आमदार रामनाथ मोते, विधानमंडळाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे, अवर सचिव सुनिल झोरे यांच्यासह राज्यातील विविध ११ द्यापीठांतील विद्यार्थी, अधिव्याख्याते उपस्थित होते.

सहसचिव श्री. मोहिते म्हणाले की, अंदाज समिती, लोकलेखा समिती, सार्वजनिक उपक्रम समिती, पंचायत राज समिती, रोहयो समिती, अनुसुचित जाती कल्याण समिती, अनुसुचित जमाती कल्याण समिती, 
अल्पसंख्याक कल्याण समिती, कामकाज सल्लागार समिती, विशेष हक्क समिती, विनंती अर्ज समिती, आश्वासन समिती, ग्रंथालय समिती
अशा समित्या विधानमंडळात कार्यरत आहेत. या समित्या विधानमंडळाच्या बाहेर विधानमंडळाचे प्रतिनिधीत्व करतात. या समित्यांचे कामकाज गोपनीय असून, त्या दरवर्षी गठित होतात, अशी माहिती त्यांनी दिली.

ते म्हणाले की, या समित्या पूर्णत: निष्पक्षपणे काम करतात. यातील 
सदस्यांची निवड ही विधानमंडळातील विविध राजकीय पक्षांच्या सदस्यांमधून होते. धोरणाच्या मलबजावणीवर लक्ष ठेवणे, शासकीय  निधीचा योग्य वापर होतो की नाही याची पाहणी करणे अशी विविध कामे या समित्यांमार्फत केली जातात. त्यामुळे शासनाला गतीमान करण्यामध्ये या समित्यांचे महत्वपूर्ण योगदान असते, असे ते म्हणाले.
 
या समित्या विविध योजना, शासकीय कामकाज यांचा अभ्यास करुन शासनाला विविध शिफारशीही करतात. शासकीय धोरणे आखताना त्याचा उपयोग होतो. त्यामुळे शासकीय धोरणे आखण्यामध्येही या समित्यांचे  महत्वपूर्ण योगदान असते, असे ते म्हणाले.
 
याप्रसंगी एसएनडीटी महिला विद्यापीठाची विद्यार्थीनी स्नेहा चाळके यांनी उपस्थितांचे आभार मानले.