ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

खादी व हस्तकला उत्पादनांच्या विक्रीसाठी शासन पुढाकार घेईल - मुख्यमंत्री फडणवीस

नागपूर, दि. १० (प्रतिनिधी) - खादी व हस्तकलांच्या माध्यमातून ग्रामीण कारागिरांनी तयार केलेल्या कापड, बांबूपासूनच्या विविध आकर्षक वस्तू, तसेच अन्य हस्तकलांच्या उत्पादनांना प्रोत्साहन देऊन  त्यांच्या विक्रीसाठी योग्य दालन उपलब्ध करुन देण्यासाठी शासन  पुढाकार घेईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
 
येथील दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्रात फॉर्च्युन फाउंडेशनच्यावतीने दि.  १० ते २०डिसेंबर पर्यंत आयोजित करण्यात आलेल्या खादी-हस्तकला  कौशल्य प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री चंद्रशेखर  बावनकुळे उपस्थित होते.

फॉर्च्युन फाउंडेशनचे अध्यक्ष आमदार अनिल सोले, सल्लागार आमदार  सुधाकर देशमुख, तसेच अन्य आमदार सर्वश्री जयकुमार रावल, चरण  वाघमारे, सरदार तारासिंग, योगेश सागर, नरेंद्र पवार, भाई विरकर, मल्लिकार्जुन रेड्डी, तसेच संदीप जाधव यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, फॉर्च्युन फाउंडेशनचा हा स्तुत्य उपक्रम आहे.  कौशल्य विकास आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याचे कार्य फाउंडेशन करते. विदर्भात खादी आणि हस्तकलेच्या विकासासाठी आणि त्यावर आधारित स्वयंरोजगारासाठी विपुल संधी आहेत.

फॉर्च्युन फाउंडेशन संधी आणि बेरोजगारात सेतू तयार करण्याचे कार्य करत आहे. शासन विविध विभागाच्या माध्यमातून अशा प्रकारच्या  प्रदर्शनाचे आयोजन करत असते. महिला व बाल विकास विभागाच्या  वतीने महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंची मोठ्या प्रमाणावर  विक्री होते. खादी व हस्तकलांच्या उत्पादनांना मोठ्या प्रमाणावर वाव  असून त्यांच्या विक्रीसाठी मोठे दालन उपलब्ध करुन देण्याची गरज आहे. हस्तकलेत तसेच खादी उद्योगातील पारंगत सर्व कलाकारांचे  मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले.
 
या प्रदर्शनात भारतातील नामवंत खादी व ग्रामीण उद्योगांची उत्पादने विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत. खादी ग्रामोद्योग विभागाचा इंद्रायणी हँडलूम स्टॉल, तसेच महिला बचत गटाची उत्पादने, खाद्य पदार्थ, धारणी येथील बाबू संशोधन केंद्राच्या वतीने बांबूच्या उत्कृष्ट कलाकृती, सिताफळे, आदी ५०स्टॉल्स उभारण्यात आले असून सर्वांनी या प्रदर्शनास भेट देऊन वस्तूंची खरेदी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
 
प्रारंभी प्रदर्शनाचे संयोजक मोहमद जहीर यांनी मुख्यमंत्र्यांना ग्रंथ भेट देऊन त्यांचे स्वागत केले.