ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

शिक्षकांना जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्याचा शासनाचा विचार - विनोद तावडे

नागपूर, दि. १५ (प्रतिनिधी) - राज्यातील शिक्षकांना जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्याबाबत शासन गांभिर्याने विचार करील, असे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधानपरिषदेत सांगितले.

राज्यात सन १९९५-९६ पासून शासन मान्यतेने सुरु झालेल्या व अनुदानाचे निकष पूर्ण केल्यानंतर सन २००४-०५ पासून अनुदानास पात्र होऊन १०० टक्के अनुदान मिळत असलेल्या प्राथमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्याबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने शासनामार्फत करण्यात येत असलेल्या कार्यवाहीबाबतचा प्रश्न सर्वश्री आमदार कपिल पाटील, डॉ. सुधीर तांबे, विक्रम काळे, अमरसिंह पंडीत, हेमंत टकले, सतीश चव्हाण आदिंनी विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना श्री. तावडे बोलत होते.

श्री. तावडे म्हणाले, राज्यातील प्राथमिक/माध्यमिक व उच्च माधमिक शाळेत १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत असलेल्या शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना नवीन परिभाषित अंशदायी निवृत्तीवेतन योजनेच्या अंमलबजावणीचे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. याबाबत उच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिलेली नाही. सन २००५ पूर्वी १०० टक्के अनुदानास पात्र ठरलेल्या शाळेतील शिक्षक/ शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू आहे. तथापि, सन २००५ नंतर १०० टक्के अनुदानास पात्र ठरलेल्या शाळेतील शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना नवीन अंशदायी पेन्शन योजना लागू असून या संदर्भातील प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत, असेही त्यांनी या प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले.

जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबतची मागणी शिक्षक संघटनांकडून सातत्याने शासनाकडे करण्यात येत आहे. तसेच याबाबत शिक्षक संघटना, लोकप्रतिनिधींच्या तीव्र भावना लक्षात घेऊन या योजनेच्या अंमलबजावणीच्या तांत्रिक मुद्यांचा विचार करुन तातडीने बैठक घेण्याचे निर्देश सभापती रामराजे नाईक-निबाळकर यांनी दिले.

यावेळी सर्वश्री आमदार निरंजन डावखरे, रामनाथ मोते, जयंत पाटील यांनी चर्चेत भाग घेतला.