ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

"शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रलंबित प्रकरणांवर तत्काळ कार्यवाही करा"

नागपूर, दि. १५ (प्रतिनिधी) - चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासंदर्भात प्रलंबित असलेल्या विषयांवर नियमानुसार तत्काळ कार्यवाही करावी, असे निर्देश अर्थ व नियोजन, वने मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अधिकाऱ्यांना दिले.

सेमिनरी हिल येथील वन सभागृहात आयोजित बैठकीत चंद्रपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रलंबित विषयांच्या आढावा बैठकीत श्री. मुनगंटीवार बोलत होते. यावेळी आमदार नाना श्यामकुळे, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी दीपक म्हैसेकर, राजीव मिश्रा, डॉ. संजय कुमार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस.एस. मोरे, कक्ष अधिकारी ए. एम. डहाळे, एस.एन. योगे, मुख्य प्रशासकीय अधिकारी संजीव राठोड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मनोज जैस्वाल, पी.के. इंगोले, एस.एस. परांजपे आदी उपस्थित होते.

बैठकीत शासकीय वैद्यकीय व रूग्णालय, चंद्रपूर येथील नवीन अभिहस्तांकित केलेल्या २० हेक्टर जागा व जोड रस्त्यासाठी वेकोलीचे ना हरकत प्रमाणपत्र व प्रस्तावित जागेवर नवीन इमारतीच्या बांधकामाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता, प्रस्तावित नवीन जागेवर वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम करण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमणूक करण्याबाबत, क्षय रूग्णालय परिसरात पदवीपूर्व मुला-मुलींसाठी वसतीगृह इमारतीच्या कामकाजाबाबत पाठपुरावा, परीक्षागृह व विद्यार्थी खानावळीचे बांधकाम, भविष्यात बल्लारपूर येथे आंतरवासियता (इंटर्नशीप) प्रशिक्षणासाठी निवासस्थान व खानावळीसाठी इमारत बांधकाम, प्राणीगृह बांधकाम, महाविद्यालयातील रिक्त पदे, फर्निचर, सुरक्षा रक्षक आदी विषयांचा सविस्तर आढावा श्री. मुनगंटीवार यांनी घेतला. तसेच महाविद्यालयाची कामे प्राधान्याने करण्यात येऊन नियमानुसार कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचनाही त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या.

प्रास्ताविक डॉ. संजय कुमार यांनी करून विषयवार सविस्तर माहिती सादर केली.