ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

अनुभूती स्कूलच्या सोहळ्यात विविध कलागुणांचे सादरीकरण

जळगाव, दि. १५ (प्रतिनिधी) - भारतीय संस्कार, संस्कृती आणि मूल्यांच्या शाश्वत आधारित आंतरराष्ट्रीय दर्जाचे उद्योगाभिमुख शिक्षण, हे अनुभूती इंटरनॅशनल रेसिडेन्शियल स्कूलचे वैशिष्ट्य येथील विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांच्या आधारे सादर केले आणि उपस्थितांची वाहवा मिळविली. निमित्त होते अनुभूती स्कूलच्या स्थापना दिनानिमित्त सादर करण्यात आलेल्या सांस्कृतिक सोहळ्याचे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही (१३ आणि १४ डिसेंबर रोजी ) अनुभूती शाळेचा स्थापना दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला. या सोहळ्याचे उदघाटन प्रसिद्ध अभिनेते राहुल सोलापूरकर आणि अनुभूती स्कूलचे संस्थापक भवरलालजी जैन यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. अनुभूतीच्या संचालिका सौ. निशा जैन, प्राचार्या श्रीमती सुषा सतीश यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते. या दोन दिवसिय सोहळ्यात पहिल्या दिवशी इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांचे सादरीकरण केले. अन्नाची नासाडी करू नका, आरोग्याला त्रासदायक जंकफूडचे सेवन करून नका, हिरव्या भाज्या, फळे यांचे सेवन करा, नियमित योगा आणि व्यायाम करून आरोग्य चांगले ठेवा, पर्यावरणाचे रक्षण करा, पाणी बचत करा यासारखे संदेश संगीत आणि नाट्य सादरीकरणाद्वारे देण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सामुहिक तबला वादनासह, गिटार, हार्मोनियम, बासरी यासारख्या वाद्यांच्या सादरीकरणाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. कार्यक्रमादरम्यान कला विभागाच्या विद्यार्थ्यांनी कॅनव्हॉसवर सुरेख चित्र रेखाटले.

दुसऱ्या दिवशी इयत्ता नववी ते बारावीतील विद्यार्थ्यांनी देशातील विविध प्रांत आणि त्यांच्या संस्कृतीचे दर्शन नृत्य आणि नाट्याविष्कारातून उपस्थितांना घडविले. त्यात प्रामुख्याने महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, पूर्वांचल, दक्षिण भारत या प्रांतांची वैशिष्ट्यांचा समावेश होता. यादरम्यान विद्यार्थ्यांनी वाळूचे उत्कृष्ट शिल्पही साकारले. अनुभूती शाळेतून उत्तीर्ण होऊन विविध अभ्यासक्रमांसाठी बाहेर गेलेल्या माजी विद्यार्थ्यांनी अनुभूती शाळेतील भावपूर्ण आठवणींना उजाळा दिला. यावेळी गांधी विचार परीक्षेसह, शैक्षणिक वर्षात प्राविण्य संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. या कार्यक्रमासाठी राज्यासह देशातील विविध भागांतून विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने हजर होते.