ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

जळगावात दोन चिमुरडय़ांसह महिलेची आत्महत्या

जळगाव, दि. १७ (प्रतिनिधी) - चारित्र्याच्या संशयावरून पतीकडून होणाऱ्या सततच्या मानसिक छळाला कंटाळून एका विवाहितेने आपल्या दोन चिमुरडय़ासह विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. भडगाव तालुक्यातील भोंडगावात ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी पतीसह सासरच्या तिघांना अटक करण्यात आली आहे.

शिला छोटू मोरे (वय ३५), असे आत्महत्या केलेल्या विवाहितेच, तर सचिन (वय ८) आणि रोहित (वय ५), अशी तिच्या मुलांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, चारित्र्याच्या संशयावरून तसेच माहेरहून पैसे आणावेत या मागणीसाठी पतीकडून केल्या जाणाऱ्या मानसिक छळाला शिला कंटाळल्या होत्या. मंगळवारपासून सचिन आणि रोहितसह त्यात घरातून बेपत्ता झाल्या. दरम्यान, विक्रम शंकर पाटील यांच्या शेतातील विहिरीत या तिघांचे मृतदेह आढळून आले.

याप्रकरणी शिला यांचा भाऊ गौतम अहिरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर शिला यांच्या पतीसह त्यांच्या सासू-सासऱ्यांना पोलिसांनी अटक केली.