ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

वेगळ्या विदर्भावरून शिवसेना-भाजप सभागृहात समोरासमोर

नागपूर, दि. १७ (प्रतिनिधी) - वेगळ्या विदर्भासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून शिवसेना आणि भाजपचे विदर्भातील आमदार गुरुवारी विधानसभेमध्ये आमनेसामने आले. शिवसेनेचे सदस्य अखंड महाराष्ट्राच्या घोषणा देत असताना विदर्भातील भाजपच्या आमदारांनीही वेगळ्या विदर्भाच्या बाजूने घोषणा देण्यास सुरुवात केली. यामुळे सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्यामुळे कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. 

श्रीहरी अणे यांनी विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापू्र्वी वेगळ्या विदर्भाच्या बाजूने वक्तव्य केले होते. त्यांच्या याच वक्तव्यावरून शिवसेना अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून आक्रमक आहे. याच विषयावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधान परिषदेत निवेदन करताना अणे यांचे विधान त्यांचे वैयक्तिक असल्याचे म्हटले होते. 

फडणवीस यांनी विधान परिषदेत निवेदन केले, मात्र, विधानसभेत अद्याप त्यांनी निवेदन केलेले नाही. ज्या दिवशी वरच्या सभागृहात निवेदन केले जाते. त्याच दिवशी खालच्या सभागृहातही निवेदन केले पाहिजे, असे संकेत आहेत, असा मुद्दा शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी उपस्थित केला. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनीही त्यांची बाजू उचलून धरली. 

त्यानंतर सभागृहात गोंधळाची स्थिती निर्माण झाली. त्यातच अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सरकारने खालच्या सभागृहात निवेदन करावे, असे निर्देश दिले. पण शिवसेनेचे सदस्य ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. त्यांनी व्हेलमध्ये जमून घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. त्याला भाजपच्या विदर्भातील आमदारांनीही प्रत्युत्तर दिले. याच गोंधळात अध्यक्षांनी कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब केले.