ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

वन्यप्राण्यांमुळे होणाऱ्या पिकाच्या नुकसानीसाठी देण्यात येणारी रक्कम झाली दुप्पट

नागपूर, दि. २१ (प्रतिनिधी) - वन्यप्राण्यांमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाचे नुकसान होते. ही नुकसान भरपाई देण्यासाठी ९ जुलै, २०१५ च्या शासन निर्णयानुसार नुकसानीपोटी देण्यात येणारी रक्कम दुप्पट करण्यात आली आहे. नुकसान भरपाईसाठी कमीत कमी १ हजार रुपये ते जास्तीत जास्त १० हजार रुपयाचा धनादेश देण्यात येतो, असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत सांगितले.

सदस्य सर्वश्री शंभुराज देसाई, शशिकांत शिंदे, आशिष देशमुख, विजय वड्डेटीवार, राहुल कुल यांनी मांडलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना श्री. मुंनगटीवार बोलत होते. ते पुढे म्हणाले की, वन्यप्राण्यांमुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान रोखण्यासाठी राज्य शासनाने सोलर कुंपण योजना आखली होती. त्या योजनेचे मूल्यमापन केले असता ती पूर्णत: अपयशी ठरली आहे. शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान रोखण्यासाठी चरी खोदणे, दगडी भिंत बांधण्याकरिता समिती तयार करण्यात आली असून समितीचा अहवाल आल्यानंतर निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

श्री. मुनगंटीवार म्हणाले की, नुकसान भरपाईपोटी देण्यात येणारी रक्कम दुप्पट करण्यात आली आहे. पिकाचे कितीही नुकसान झाले तरी मदत करताना अर्थसंकल्पात तरतूद नसली तरी आम्ही मदत देण्यासाठी उणी सिस्टीम लागू केली आहे. नुकसानग्रस्तांना मदत देण्यासाठी ज्या त्रुटी होत्या त्या दूर करुन उणी सिस्टीम कार्यान्वित केली आहे. सेवा हमी कायद्यांतर्गत राज्यात असणाऱ्या ४३ सेवांपैकी दहा सेवा वन विभागाच्या आहेत. नुकसान भरपाईपोटी देण्यात येणारी मदत २६ दिवसांच्या आत देण्यात येते.