ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

प्रदूषणामुळे चंद्रपूर झाले नरकपूर

चंद्रपूर, दि. २४ (प्रतिनिधी) - वीज केंद्र, कोळसा खाणी व इतर घटकांच्या वाढत्या प्रदूषणामुळे चंद्रपूरमधील सव्वालाख लोकांना श्वसन, त्वचा व हृदयविकाराचा आजार झाला असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे प्रदूषित संच तातडीने बंद करावे, अशी मागणी स्वयंसेवी संस्थांनी केली आहे. 

शहरात क्षयरोग, त्वचेचे विकार, अॅसिडिटी, उच्च रक्तदाब, दमा, श्वसनाचे विकार यामुळे २०११-१२ याच वर्षी १०२ लोकांचा मृत्यू झालेला आहे. २०१३-१४ मध्ये ९० लोकांचा मृत्यू झालेला आहे. या शहरातील प्रदूषण पाच वर्षांत एकूण २७७ लोकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरले आहे. 

गेल्या अनेक वर्षांपासून येथील संचामधून मोठय़ा प्रमाणात फ्लाय अॅश वातावरणात सोडली जात आहे. यामुळे दिवसेंदिवस दमा, खोकला, सर्दी, डोळ्यांचे आजार, त्वचेचे आजार, फुप्फुसांचे आजार, श्वसनाचे आजार मोठय़ा प्रमाणात वाढत आहेत. 

एकटय़ा चंद्रपूर शहरात श्वसनाच्या आजाराचे १७ हजार रुग्ण आढळले आहेत. त्वचा विकाराचे ५०० रुग्ण दर वर्षी सरकारी रुग्णालयात येत आहेत. मागील ५ वर्षांत श्वसनाच्या विकाराचे तब्बल ८८ हजार ५६३ रुग्ण चंद्रपुरात आढळले, तर त्वचारोगाच्या रुग्णांची संख्या २५ हजारांवर नोंदवलेली आहे. त्यापैकी ३४३ लोकांचा मृत्यू या कारणांनी झालेला आहे. २०१०-११ या एकाच वर्षांत २७ लोकांचा मृत्यू प्रदूषणाशी निगडित आजारांशी झाला होता, असा शेरा सामान्य रुग्णालयाने दिलेला आहे.