ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

संतप्त जमावाने वेश्याव्यवसाय चालणारे घरच जाळले

अमरावती, दि. २४ (प्रतिनिधी) - शहरातील अंबाविहार येथे एका घरात सुरू असलेल्या वेश्याव्यवसाबद्दल नागरिकांनी पोलिसांत तक्रार देऊनही पोलीस कारवाई करत नसल्याचे पाहून संतप्त नागरिकांनी घरात घुसरून फर्निचरची मोडतोड केली तसेच गाद्या पेटवून दिल्या.

मिळालेल्या माहितीनुसार नागरिक वारंवार पोलिसांकडे येथील वेश्याव्यवसायाबद्दल तक्रर करीत होते. पोलीसही कारवाईचे नाटक करीत होते. प्रत्येक छाप्याची कुणकुण अगोदरच घरातील लोकांना लागत होती. त्यामुळे ते पसार होत होते. पोलीसही हात हलवत परत येत असत.

देहविक्री व्यवसायामुळे परिसरातील युवती व महिलांना येथे येणाऱ्यांचा त्रास वाढत गेल्याने काल (बुधवारी) नागरिकांचा उद्रेक झाला. या भागातील महिला मोठ्या संख्येने पोलीस ठाण्यावर गेल्या. पोलिसांपुढे त्यांनी कैफियत मांडली. देहविक्री करणाऱ्या महिलेचा गुंड प्रवृत्तीचा अल्पवयीन मुलगा परिसरात गोंधळ घालत असल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनीही तातडीने कारवाई करतो असे आश्वासन दिले. 

पोलीस कारवाई करणार असल्याने महिला पोलीस ठाण्यातून निघून महिलेच्या घरासमोर जाऊन थांबले. परंतु बराच वेळ झाला तरी पोलीस आलेच नाहीत. त्यामुळे नागरिक संतप्त झाले. त्यांनी बंगल्याच्या गेटचे कुलूप तोडून बंगल्यात प्रवेश केला. घरातील साहित्याची प्रचंड नासधूस केली. टायर व रॉकेलच्या साहाय्याने गाद्या व अन्य साहित्य जाळले. जवळपास दोनशे महिला व पुरुष या वेळी उपस्थित होते. तोडफोड व जाळपोळीनंतर जवळपास तासभराने पोलीस घटनास्थळी पोहोचले.