ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

वाघाच्या चार बछड्यांचा भूकेमुळे मृत्यू

चंद्रपूर, दि. २८ (प्रतिनिधी) - रविवारी वाघाच्या चार बछड्यांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. चंद्रपूरमधील सावली गावापासून सुमारे १२ किलोमीटर अंतरावर असोलामेंढा कॅनॉलजवळ तीन बछडे मृतावस्थेत तर एक बछडा गंभीर अवस्थेत आढळा. त्याच्यावर चंद्रपूरच्या पशुसंवर्धन विभागाच्या रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र त्याचे प्राण वाचू शकले नाहीत. या चार पिलांची आई बेपत्ता असल्याने उपासमार होऊन त्यांचा मृत्यू झाला आहे.

स्थानिक गावकऱ्यांना वाघाचे बछडे मृतावस्थेत आढळल्याने त्यांनी त्याची खबर तातडीने वनविभागाला दिली. पण हद्द कुणाची यात अधिकाऱ्यांनी वेळ घालवल्याने गंभीर अवस्थेतील बछड्याला वेळीच उपचार मिळू शकले नाहीत. त्यामुळे चौथ्या बछड्याचाही मृत्यू झाला.

दरम्यान या मृत्यूप्रकरणी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. मोठा गाजावाजा करुन सुरु झालेल्या व्याघ्र मोहिमेला या घटनेने धक्का बसला आहे.