ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

काँग्रेस-राष्ट्रवादीवर बंदी घाला - नंदकुमार जाधव

जळगाव, दि. २८ (प्रतिनिधी) - ‘साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी भगवान श्रीकृष्णाला व्यभिचारी व ड्रायव्हर संबोधले. त्यांचे असले उद्योग खपवून घेणार नाही,’ असा इशारा सनातन संस्थेचे संत नंदकुमार जाधव यांनी रविवारी एका सभेत दिला. सनातन संस्थेवर बंदी आणण्याचा कंठशोष करणाऱ्यांच्या मागणीला आम्ही भीक घालत नाही. सनातनवर बंदी घालायची भाषा करत असाल, तर शिखांची कत्तल घडवून आणणाऱ्या काँग्रेसवर आधी बंदी घाला. तसेच पद्मसिंह पाटील खुनी असल्याचे सिद्ध झाले असतानाही त्यांना पक्षात ठेवणाऱ्या राष्ट्रवादीवरही बंदी घाला, असे आव्हान त्यांनी दिले.

सनातन संस्था व हिंदू जनजागृती समितीतर्फे जळगावात धर्मजागृती सभा आयोजित करण्यात आली होती. व्यासपीठावर श्रीराम युवा सेनेचे संस्थापक-अध्यक्ष आमदार राजासिंह ठाकूर, सनातन संस्थेच्या प्रचारसेविका स्वाती खाडे व हिंदू जनजागृती समितीचे राज्य संघटक सुनील घनवट उपस्थित होते.

जाधव म्हणाले की, ‘गोमांस खाणारे, काश्मीरमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकवणारे, बंगालमधील हिंदूंचा छळ पाहून शाहरुख व आमिर खानचे तोंड का उघडत नाही? मात्र, दादरी प्रकरणानंतर शाहरुखला असहिष्णुता आठवते व आमिर दुसऱ्या देशात जाण्याची भाषा करतो. त्यांनी खुशाल जावे; परंतु येथे कमावलेली संपत्ती सरकारच्या स्वाधीन करावी. आता जनतेनेही त्यांच्या चित्रपटांवर बहिष्कार टाकावा,’ असे आवाहनही जाधव यांनी केले.

कॉ.पानसरे हत्या प्रकरणात समीर गायकवाडला अटक केली आहे; पण तो निर्दोष असून त्याला गोवले गेले आहे. त्याचप्रमाणे साध्वी प्रज्ञा सिंह व कर्नल पुरोहित हे देशभक्त आहेत. हिंदूंना धर्मशिक्षण देतो म्हणून आम्ही दहशतवादी आहोत का? सनातन संमोहित करून दहशतवादी कृत्य करून घेत असल्याचा आरोप करणारे श्याम मानवांसारखे खोटारडे लोक अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करताहेत. डॉ. दाभोलकरांचा भ्रष्टाचार उघडकीस आणला म्हणून त्यांनी सनातनवर आरोप केले होते, असेदेखील जाधव म्हणाले.