ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

सरस्वतीच्या रत्नांचा जगभरात नावलौकिक - मुख्यमंत्री

नागपूर, दि. २९ (प्रतिनिधी) - सरस्वतीच्या रत्नांनी विविध क्षेत्रात जगभरात आपला नावलौकिक मिळविला आहे. सरस्वती विद्यालयासाठी ही अभिमानाची बाब असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

सरस्वती विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा शाळेच्या प्रांगणात र‍विवारी झाला. या मेळाव्यात शाळेच्या पाच माजी विद्यार्थ्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सरस्वती रत्न पुरस्काराने गौरव करण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

शाळा या खऱ्या अर्थाने संस्कार केंद्रे आहेत. याची प्रचिती या पाच महान विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात मिळविलेल्या नावलौकिकाने आली आहे. मेजर जनरल अजित गद्रे, जी.जयरामन, डॉ.एम.सौम्य नारायणन, नागराज शर्मा आणि डॉ.रामचंद्रन नटराजन यांनी आपापल्या क्षेत्रात उत्तमोत्तम कामगिरी करुन समाजासमोर एक आदर्श निर्माण केला असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

आपल्याला समाजाने भरभरुन दिलेले आहे. ते आता समाजाला परत करण्याची वेळ आलेली आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने समाजासमोर एक आदर्श निर्माण करण्याचे स्वप्न पहावे. समाजातल्या विविध क्षेत्रात काम करुन खरा हिरो होण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्याची आज गरज असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

सरस्वती विद्यालयाने अशा प्रकारचे समाजासमोर आदर्श निर्माण करणारे कार्यक्रम दरवर्षी आयोजित करावेत, अशा चांगल्या कार्यक्रमांना मी दरवर्षी नक्कीच उपस्थित राहीन, अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. 

या पाच जणांची निवड डॉ.सीमा सोमलवार, सत्यरंजन धर्माधिकारी आणि यशवंतराव कानेटकर यांनी केली. यावेळी परीक्षक मंडळाच्या सदस्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.