ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

शासकीय मुद्रणालयाचे आधुनिकीकरण करणार - नितीन गडकरी

>> विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती
>> बांधा व वापरा तत्त्वावर विकास करणार
नागपूर, दि. २९ (प्रतिनिधी) - शासकीय मुद्रणालयाचे आधुनिकीकरण करुन तीनही मुद्रणालये एकाच छताखाली आणण्यात येणार आहेत. यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करुन अहवालानंतर पुढील पावले उचलण्यात येतील. त्यांच्या अहवालानुसार कामे करण्यात येतील, असे केंद्रीय वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी येथे सांगितले. शासकीय मुद्रणालय परिसरात आयोजित मुद्रणालयाची पाहणी व बैठकीनंतर आयोजित समारंभात बोलत होते.

यावेळी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार प्रा.अनिल सोले, नागो गाणार, मल्लिकार्जुन रेड्डी, महापौर प्रवीण दटके, विभागीय आयुक्त अनूप कुमार, मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, उपमहापौर मुन्ना पोकुलवार, सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी, स्थायी समिती अध्यक्ष रमेश शिनगारे, मुद्रणालयाचे व्यवस्थापक ए.वाय. दुधगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

शासकीय मुद्रणालय, वनविभाग आणि महानगरपालिकेच्या जागेवर सर्व सुविधायुक्त असे व्यापारी संकुल उभारण्यात येईल. या व्यापारी संकुलात तीनही शासकीय मुद्रणालये, वनविभाग यांच्यासह शहरातील भाड्याच्या जागेत असलेली सर्व शासकीय कार्यालये एकाच छताखाली आणण्यात येतील, असेही नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितले.

यासाठी विभागीय आयुक्त अनूप कुमार यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करुन ही समिती तीन महिन्यात याबाबतचा अहवाल सादर करेल. त्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. हे सर्व करत असताना शासकीय मुद्रणालयाला अत्याधुनिक करण्यात येईल. अद्ययावत यंत्रसामुग्री आणून कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येईल.

झिरो माईल जवळ मेट्रो रेल्वे स्टेशन राहणार असून, येथील व्यापारी संकुलासह झिरो माईलचे जागतिक दर्जाचे सौदर्यींकरण करण्यात येईल.या व्यापारी संकुलामध्ये भूमिगत पार्कींगला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे सांगून खाजगी वास्तुविशारदाची नेमणूक करण्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी त्यांनी विभागीय आयुक्तांकडे तसेच यासंबंधी राज्य विधीमंडळात वेळोवेळी प्रश्न लावून धरला, त्याबद्दल नितीन गडकरी यांनी आमदार प्रा.अनिल सोले आणि आमदार नागो गाणार यांचे विशेष कौतुक केले. हे व्यापारी संकुल निर्मितीसाठी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचेही कौतुक केले.