ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

मेगा रिचार्जमुळे होईल हरित खान्देशचे स्वप्न साकार - मुख्यमंत्री

जळगाव, दि. १ (प्रतिनिधी) - सिंचनाच्या क्षेत्रात जागतिक आश्चर्य ठरावा अशा मेगा रिचार्ज प्रकल्पासाठी केंद्र शासनाकडून निधी मिळणार आहे. हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यास हरित खान्देशचे स्वप्न साकार होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

येथील चांगदेव शिवार ता. मुक्ताईनगर येथे आदिशक्ती मुक्ताई सहकारी सुतगिरणीच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. अध्यक्षस्थानी सहकार, पणन व सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) चंद्रकांत पाटील होते. यावेळी पालकमंत्री एकनाथराव खडसे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रयागताई कोळी, राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष मोहम्मद हुसेन खान, खासदार ए. टी. नाना पाटील, खासदार रक्षाताई खडसे, आमदार सर्वश्री हरिभाऊ जावळे, संजय सावकारे, उन्मेश पाटील, सुरेश भोळे, किशोर पाटील, चंद्रकांत सोनवणे, सूतगिरणीच्या तसेच जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या चेअरमन रोहिणीताई खडसे-खेवलकर, जिल्हा दूध संघाच्या अध्यक्ष मंदाताई खडसे, जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर, जैन उद्योग समुहाचे उपाध्यक्ष अशोक जैन, माजी खासदार डॉ. गुणवंतराव सरोदे, डॉ. राजेंद्र फडके, वस्त्रोद्योग महासंघाचे अशोक स्वामी आदी उपस्थित होते.

यावेळी सुतगिरणीच्या प्रांगणात स्व. निखिल खडसे यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरणही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. सुतगिरणीच्या उद्घाटनानंतर मुख्यमंत्र्यांनी संपुर्ण प्रकल्पाची पाहणी केली. त्यानंतर आयोजित समारंभात त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.