ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

दोन शिक्षकांसह चौघांना बिबट्याच्या कातड्याची पूजा करताना अटक

>> शिक्षकही अंधश्रद्धेचे बळी
गडचिरोली, दि. २ (प्रतिनिधी) - बिबटयाचे कातडे अवैधरित्या बाळगणाऱ्या चार जणांना वनाधिकाऱ्यांनी एटापल्ली तालुक्यातील घोटसूर येथून अटक केली. हे चौघे चामड्याची पूजा करून पैशांचा पाऊस पाडण्‍याची विधी करत होते, अशी माहिती वन विभागाच्‍या पथकाला मिळाली आहे. धक्‍कादायक बाब म्‍हणजे या चौघांमध्‍ये जिल्‍हा परिषदेच्‍या दोन शिक्षकांचाही समावेश होता.

संजय महादेव देशपांडे, शरद रामचंद्र दोहतरे हे दोघेही घोटसूर येथील राहणारे. तर, संतोष आगलावे (राजुरा) व किसन देवकर (गडचांदूर जि.चंद्रपूर) अशी आरोपींची नावे आहेत. आज चारही जणांना अहेरी न्यायालयामध्‍ये हजर करण्यात आले आहे. न्यायालयाने सर्वांना ५ जानेवारीपर्यंत वनकोठडी सुनावली.

घोटसूरमध्‍ये एका व्‍यक्‍तीजवळ बिबटयाचे कातडे असल्याची खबर वनाधिकाऱ्यांना मिळाली. काहीजण पूजा-अर्चा करण्यासाठी तेथे आल्याचेही  वनाधिकाऱ्यांना माहिती मिळाली. वनाधिकाऱ्यांनी इतर अधिकारी कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन रात्रीच घोटसूर गाव गाठले. यावेळी संजय देशपांडे याच्या शेतात हे चौघे कातडे ठेवून पूजा करताना दिसले. वनाधिकाऱ्यांनी या सर्वांना ताब्यात घेऊन अटक केली. संजय देशपांडे व शरद दोहतरे हे दोघेही जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत.