ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

डॉक्टरांनी अंत्यसंस्कारासाठी मृतऐवजी दिले जिवंत बाळ

अकोला, दि. १५ (प्रतिनिधी) - रुग्णालयात उपचार सुरू असताना तीन दिवसांचे बाळ दगावले. नातेवाइकांच्या ताब्यात ते मृत बाळ देण्याऐवजी दुसरेच जिवंत बाळ कपड्यामध्ये गुंडाळून देण्यात आले. नातेवाईक  अंत्यसंस्कारासाठी ते घेऊन जात असताना बाळाने हालचाल केली. बाळाला घाईघाईत परत वॉर्डमध्ये नेण्यात आले. तेथे जिवंत आणि मृत बाळाची अदलाबदली झाल्याचा प्रकार समोर आला. ही घटना बुधवारी अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयातील आयसीयूत घडली.

रिसोड तालुक्यातील महिला प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल झाली. रविवारी तिने मुलाला जन्म दिला. मात्र, वजन कमी असल्यामुळे त्याला आयसीयूत दाखल करण्यात आले. बुधवारी बाळाचा मृत्यू झाला. त्यानंतर नातेवाइकांना बाळ दगावल्याची माहिती देण्यात आली. बाळावर अंत्यसंस्कार करण्यासाठी नातेवाइकांनी कपडे आणले. मात्र, त्या कपड्यात मृत बाळाऐवजी दुसऱ्या जिवंत मुलीलाच गुंडाळून देण्यात आले. 

काही अंतर गेल्यावर त्या मुलीने हालचाल केली. आपले बाळ तर जिवंतच आहे, असे समजून नातेवाईक लगेच अतिदक्षता विभागात दाखल झाले आणि बाळ जिवंत असल्याचे सांगितले. त्यानंतर डॉक्टरांनी बाळाला तपासले असता मुलगा नाही तर मृत म्हणून दुसऱ्याची मुलगी अंत्यसंस्कारासाठी दिल्याचे लक्षात आल्याने मोठी घोडचूक टळली.