ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

इंडियन मुजाहिदनचा फरार अतिरेकी मुकीम खानला अटक

भोपाळ, दि. १६ (प्रतिनिधी) गुजरातेतील अहमदाबाद येथे सन २००८ मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांत सहभागी असलेला अबरार आणि त्याचे साथीदार औरंगाबादेत असल्याची माहिती एटीएसला मिळाली. ते इंडियन मुजाहिदीनचे अतिरेकी असल्याचेही समोर आले होते. २६ मार्च २०१२ रोजी एटीएसने त्यांच्यावर कारवाई केली. 

रोजाबाग येथे झालेल्या शूटआऊटमध्ये अजहर कुरेशी ऊर्फ खलील (३०, रा. खांडवा, मध्य प्रदेश) मारला गेला, तर अबरार ऊर्फ इस्माईल ऊर्फ मुन्ना (२५, रा. उज्जैन), खलील ऊर्फ शाकेर यांना अटक करण्यात आली होती. तेव्हापासून त्यांची चौकशी सुरू होती. दरम्यान चौथा साथीदार अकील खिलजी यालाही अटक करण्यात आली होती.

शुक्रवारी शराफत ऊर्फ अमान ऊर्फ सरफराज ऊर्फ मुकीम खान याला मध्य प्रदेश एटीएसने खांडवा येथून एटीएसच्या पथकाने गुरुवारी अटक केली. पुढील चौकशीसाठी त्याला महाराष्ट्र एटीएसच्या ताब्यात देण्यात आले. नागपूर येथील न्यायालयाने त्याला २८ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. चार वर्षांपासून महाराष्ट्र एटीएस शराफत आणि त्याच्या साथीदारांच्या शोधात होते. 

बुलडाण्याच्या सैलानी येथे घातपाताचे प्रशिक्षण शिबिर घेतल्याच्या प्रकरणात शराफत हवा होता. तो ‘सिमी’चा कार्यकर्ता असल्याचे समोर आले आहे. गुजरात स्फोटाचीही लिंक तपासली जात आहे.