ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

श्रीहरी अणेंनी पुन्हा आळवला वेगळा विदर्भ राग

>> महाराष्ट्रात चपराशीही होण्याची लायकी नाही

चंद्रपूर, दि. २४ (प्रतिनिधी) - राज्याचे महाधिवक्ता ॲडव्होकेट श्रीहरी अणे यांनी पुन्हा वेगळ्या विदर्भाचा राग आळवला आहे. त्यांनी म्हटले आहे की, नागपूर कराराने २२ टक्के नोकऱ्या दिल्या. पण गेल्या तीन वर्षांत पुन्हा परिस्थिती बदलली. अडीच टक्केच नोकऱ्या विदर्भाच्या वाट्याला आल्या आहेत. महाराष्ट्रात आपण चपराशीदेखील होण्याच्या लायकीचे नाहीत.

चंद्रपुरातील जनता महाविद्यालयाच्या प्रांगणावर शनिवारी सायंकाळी अणे यांचे विदर्भ गाथा हे जाहीर व्याख्यान झाले, त्या वेळी ते बोलत होते. अणे म्हणाले की, राजकीय पक्षांवर विश्वास ठेवू नका. पुढील निवडणुकीत विदर्भवाल्यांनीच उतरावे. जनतेने फक्त त्यांनाच निवडून द्यावे. तेलंगणची किंमत रक्ताने मिळाली म्हणून आम्ही आमची १२०० मुले मारायली काय ? उर्वरित राज्यनिर्मितीच्या वेळी हा रक्तपात कुठे दिसला ? पण सरकार डोळेझाक करून राज्य करीत असेल तर भीती वाटते की तो राग मला युवकांमध्ये दिसतोय.

विदर्भ पोसतो म्हणून महाराष्ट्र पोसला जातो, हे ध्यानात ठेवा. केवळ उद्योग आणून अधोगतीला जाणारे विदर्भ राज्य नसावे. विदर्भाच्या भल्यासाठी ते तयार व्हायला हवे. त्यात ८० टक्के विदर्भातील शेतकऱ्यांचा व जंगलात राहणाऱ्या आदिवासींचा विचार व्हावा.