ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

दहा वर्षांच्या युग चांडक खूनप्रकरणी दोघांना फाशीची शिक्षा

नागपूर, दि. ४ (प्रतिनिधी) - नागपुरातील १० वर्षीय युग चांडक अपहरण करून खून केल्याप्रकरणी दोषी आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. राजेश धनलाल दवारे (वय १९) आणि अरविंद अभिलाष सिंह (वय २३) अशी फाशी झालेल्या आरोपींची नावे आहेत. हे दोघेही नागपूरातील कामठी मार्गावरील पीडब्ल्यूएस महाविद्यालयाचे बी. कॉम. प्रथम वर्षाचे विद्यार्थी होते. 

युगच्या वडिलांनी नोकरीवरून काढून टाकून अवमानजनक वागणूक दिल्याचा बदला आणि खंडणी वसुलीतून युगचे २०१४ साली सप्टेंबर महिन्यात अपहरण करून हत्या करण्यात आली होती. न्यायाधीश किशोर सोनवणे यांनी आज हा निकाल दिला.

आरोपी राजेश हा डॉ. चांडक यांच्या क्लिनिकमध्ये काम करत होता. मात्र, कामादरम्यान झालेल्या वादातून त्याला कामावरून काढून टाकण्यात आले होते. त्याचा बदला घेण्यासाठीच आरोपींनी युगचे अपहरण करून त्याचा खून केला. हत्या केल्यानंतर पोलिसांची दिशाभूल करण्याकरता त्यांनी डॉ. चांडक यांच्या घरी फोन करत खंडणीसाठी धमकीही दिली होती. युगची हत्या करून त्याचा मृतदेह शहरापासून २७ किलोमीटर अंतरावर पाटणसावंगी गावाजवळ पुरण्यात आला होता.