ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

कॅन्सरग्रस्ताच्या मदतीसाठी मुलांनी केली घरोघरी जाऊन रद्दी गोळा

जळगाव, दि. १६ (प्रतिनिधी) - अकरावर्षांपासून कॅन्सरशी लढणाऱ्या अमरावती येथील कोमल कुंभलवारच्या उपचारासाठी प्रयास संस्थेतर्फे रविवारी एकाच दिवशी जळगावसह चार शहरात रद्दी संकलित करण्याचा अनोखा उपक्रम राबवण्यात आला. 

मू. जे. महाविद्यालयाच्या २०० स्वयंसेवकांनी घरोघरी जाऊन १० तासांत ६ हजार १५० किलो रद्दी गोळा केली. ती ११ रुपये किलोप्रमाणे विकून जमा झालेले ६७ हजार ६५० रुपये कोमलला देण्यात आले. जळगावकरांनी रद्दी देण्यासोबत कोमलला आरोग्यमय जीवन लाभो, अशी प्रार्थनाही केली.

किरकोळ रद्दी ८ रुपये किलो दराने घेतली जाते. होलसेलमध्ये ९.३० दर देतो. मात्र, कोमलच्या जीवासाठी राबवण्यात येणाऱ्या उपक्रमाला हातभार म्हणून ना नफा, ना तोटा या तत्त्वावर ११ रुपये किलोप्रमाणे ही रद्दी घेतली. केवळ कागद फॅक्टरीला जाण्याएवढाच खर्च यातून काढला असे रद्दी दुकानदार श्रीकांत डहाळे यांनी सांगितले.

कोमलच्या उपचारासाठी मुख्यमंत्री, पंतप्रधान निधीमधून अन्य संस्थांकडून मदत मिळण्याची शक्यता आहे. कदाचित कोणीतरी दानशूर व्यक्तीही तिला पूर्ण रक्कम देण्यास तयार होतील; पण हा फक्त आर्थिक मदतीचा प्रश्न नाही. तर कोमलची तिच्यासारख्या अनेकांची लढाई लाखो लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी डॉ. अविनाश सावजी यांच्या ‘प्रयास’ संस्थेतर्फे जळगाव, यवतमाळ, अमरावती, नागपूर येथे हा उपक्रम राबवण्यात आला. यातून समाजातील परोपकाराविषयीच्या संवेदनेला बळ मिळावे. युवा वर्गाची ताकद विधायक उपक्रमांकडे वळावी. चांगले विचार कृती करणाऱ्यांची साखळी जोडून, गरजू रुग्णांना, होतकरू तरुणांना मदत मिळावी त्यासाठीची स्थायी यंत्रणा निर्माण करावी यासाठी हा उपक्रम राबविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.