ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

बुलेट ट्रेनपेक्षा रेल्वेतील पायाभूत सुविधा वाढवण्याची गरज - ई. श्रीधरन

नागपूर, दि. १९ (प्रतिनिधी) - देशातील रेल्वेमध्ये पायाभूत सुविधांची वानवा आहे. त्यामुळे भारताला सध्या बुलेट ट्रेनची गरज नाही, असे परखड मत मेट्रोमॅन ई. श्रीधरन यांनी व्यक्त केले आहे.

नागपूर मेट्रो रेल्वे कंपनीला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त ई. श्रीधरन नागपुरला आले होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, की दिल्ली मेट्रोचा पहिला टप्पा ६५ किलोमीटरचा होता. त्यासाठी १० वर्षांचा कालावधी देण्यात आला होता. पण आम्ही केवळ सात वर्षे आणि तीन महिन्यात ही योजना पूर्ण केली. खर्चिक आणि मोठ्या गुंतवणुकीचा प्रकल्प म्हणून मेट्रोकडे बघितले जाते. पण त्याचा लाभही तसाच होतो. नागपूर मेट्रोचा प्रत्येक वर्षी आढावा घेतला आणि त्याप्रमाणे उपाययोजना केल्या तर निर्याधित कलावधीपूर्वी हा प्रकल्प पूर्ण होऊ शकतो.

नागपूर मेट्रोसमोर सध्या मोठे आव्हान आहे. डिसेंबर २०१८ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करायचा आहे. प्रकल्पाला उशीर झाला तर प्रत्येक वर्षी प्रकल्प खर्च पाच टक्क्यांनी वाढणार आहे. म्हणजेच दिवसाला तब्बल ५० लाख रुपयांचा फटका बसणार आहे.

नागपूर मेट्रोचा टप्पा ३८ किलोमीटरचा आहे. तब्बल ३.५ लाख नागपूरकर दररोज मेट्रोने प्रवास करतील. त्यामुळे ३५ हजार वाहनांचा भार कमी होईल. प्रदूषणात घट झालेली दिसून येईल. वेळेतही बचत होईल. या प्रकल्पाचा ६० टक्के भाग कर्जाच्या माध्यमातून उभा केला जाणार आहे. त्यामुळे वेळेचे बंधन पाळणे अनिवार्य आहे.

सध्या देशाला बुलेट ट्रेनची गरज नाही तर भारतीय रेल्वेतील पायाभूत सुविधा वाढविण्याची आवश्यकता आहे. ८ ते १० वर्षांनी देशाला बुलेट ट्रेनची गरज भासेल. सध्या तरी तशी गरज दिसून येत नाही.