ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

नागपुरातील सर्व तृतीयपंथियांचा पोलीस ठाण्यात राडा

नागपूर, दि. २७ (प्रतिनिधी) - नागपूरच्या नंदनवन पोलिस स्थानकात तृतीयपंथीनी अभूतपूर्व गोंधळ घातला. उत्तम बाबा नावाच्या तृतीयपंथीयाने इतर तृतीयपंथीचे आधार कार्ड आणि निवडणूक ओळखपत्र त्याच्याकडे जमा करुन घेतले होते. आपल्याला एका कार्यक्रमासाठी बाहेर जायचे आहे असे सांगून सर्व तृतीयपंथीचे कागदपत्रे त्याने गोळा केले होते. मात्र नंतर त्याने सर्वांची कागदपत्रं हरवल्याचे सांगून कागदपत्रे देण्यास नकार दिला.

यानंतर सर्व तृतीयपंथीयांनी पोलिसात धाव घेतली. आमची कागदपत्रे परत मिळवून द्या, या मागणीसाठी सर्व तृतीयपंथी नंदनवन पोलिस स्थानकात पोहोचले आणि उत्तमबाबाला अटक करा अशी मागणी करू लागले.

सर्व तृतीयपंथी आणि स्वतः आरोपी उत्तमबाबा पाचपावली परिसरातले असल्यामुळे पोलिसांनी पाचपावली पोलिस स्थानकात तक्रार देण्यास सांगितले. त्यामुळे पोलिस उत्तमबाबाची पाठराखण करत आहेत, असा गैरसमज झालेले तृतीयपंथी चिडले आणि त्यांनी पोलिस स्थानकात आपले कपडे काढत गोंधळ करायला सुरुवात केली. अश्लील हातवारे करत पोलिसांना शिव्या देऊ लागले. ही घटना १९ फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजता घडली.

सुरूवातीला पोलिस कर्मचारी या प्रकाराने गोंधळून गेले. मात्र नंतर सर्व तृतीयपंथीची समजूत घालत त्यांना पाचपावली पोलिस स्थानकात नेऊन त्यांची तक्रार दाखल करुन घेण्यात आली.