ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

कार झाडाला धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात ६ जणांचा मृत्यू

होशंगाबाद (मध्य प्रदेश), दि. ४ - मध्य प्रदेशातील चौरागडच्या महादेवाच्या दर्शनासाठी गेलेल्या चंद्रपुरातील भाविकांचे वाहन झाडाला धडकल्याने ६ जणांचा मृत्यू तर ७ जण जखमी झाले. ही घटना गुरुवारी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रपूरच्या माथा या गावातील १४ जण चौरागड महादेवाच्या दर्शनासाठी निघाले होते. वाहनाची ८ प्रवाशांची क्षमता असूनही त्यात १४ जण बसले होते. एका वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ते थेट झाडावर जाऊन आदळले. चालकाने लागलीच वाहनातून उडी मारत पळ काढला. अत्यंत भीषण प्रकारे घडलेल्या या अपघातातील मृत आणि जखमींना वाहनाला कापून बाहेर काढावे लागले.

मृतांमध्ये एका अडीच वर्षीय बालिकेचा तसेच ३० वर्षीय महिलेचाही समावेश आहे. मात्र, त्यांची अद्यापही ओळख पटलेली नाही. सर्व सातही जखमींवर मध्यप्रदेशातील पिपरिया येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.