ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

चव्हाणांनी सत्तेचे विकेंद्रीकरण करून नेतृत्व घडविले – शरद पवार

नाशिक, दि.१२ (प्रतिनीधी) - यशवंतराव चव्हाण हे एक दूरदृष्टी असलेले नेते होते. पंचायत राज, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यांनी खेड्यापाड्यातील सामान्य माणसाचा विकास कसा होईल याला गती देण्याचे काम केले. सत्तेचे विकेंद्रीकरण करून तळागाळातील नेतृत्व घडवण्याचे दूरगामी कार्य त्यांनी केले असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी आज नाशिक येथे बोलताना केले.  
 
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात उभारण्यात आलेल्या यशवंतराव चव्हाण कलादालनाचे उदघाटन आणि ‘यशवंतराव चव्हाण आणि आधुनिक महाराष्ट्र’ या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्राचे उदघाटन यशवंतराव चव्हाण यांच्याच जन्मदिनी खा. शरद पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. माणिकराव साळुंखे हे होते. 
 
शरद पवार म्हणाले, मराठी भाषिकांच्या राज्याची निर्मिती करण्यात यशवंतराव चव्हाण यांची भूमिका महत्त्वाची राहिली. त्यांनी सहकार चळवळ वाढीस लावण्यासाठी दिलेले योगदान अतिशय मोठे आहे. त्यामाध्यमातून साखर कारखानदारी, सूतगिरणी, उद्योजक निर्माण करून नवी पिढी घडविण्याचे स्वप्न पाहून ते प्रत्यक्षात उतरविले. याशिवाय व्यक्ती आणि त्यांचे व्यक्तिमत्वही यशवंतरावांनी त्यात्या पातळीवर घडविले. या प्रसंगी अनेक जुन्या आठवणींना पवार यांनी उजाळा दिला. यशवंतराव चव्हाण यांची भाषणे म्हणजे मेजवानीच असल्याचे सांगतानाच त्यांचे व्यक्तिगत जीवन मात्र अत्यंत भावनाशील होते, हे सांगण्यासही ते विसरले नाही. 

देश आर्थिक संकटात असताना अर्थ विभागाला न्याय देण्याचे कामही त्यांनी अतिशय अभ्यासपूर्वक केले. राजकीय क्षेत्रात वावरत असताना त्यांनी वाचनात मात्र कधीही खंड पडू दिला नाही. वाचन हे मोठे व्यसन त्यांना जडलेले होते. कित्येक वर्षे सत्ता भोगून त्यांनी जगाचा निरोप घेतला तेव्हा त्यांच्या बँक खात्यावर केवळ २७ हजार रूपये होते तर त्याच्या राहत्या घरात पाच हजार पुस्तके सापडली म्हणजे ग्रंथ हेच धन त्यांनी मानले होते असे ते म्हणाले. विद्यापीठाने उभारलेल्या यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनपटावर प्रकाश टाकण्यासाठी या कलादालनात संग्रहित केलेले साहित्य, कलाकृती आणि भावी पिढीला खुली करून दिली हि अतिशय आनंदाची बाब असल्याचेही त्यांनी सांगितले.
 
यावेळी प्रा. आनंद पाटील लिखित ‘ग्रंथांनी रचलेला महापुरुष – यशवंतराव चव्हाण’ या पुस्तकाचे प्रकाशन शरद पवार यांच्या करण्यात आले. तसेच कवी अरुण नाईक (कुडाळ, जि. रत्नागिरी), कवयित्री बालिका ज्ञानदेव या लोणंद (माळशिरस, पुणे) आणि जळगाव येथील कवी डॉ. अस्मिता गुरव यांचा विशाखा काव्य पुरस्कार देवून सन्मान केला. तर पुण्याच्या प्रेरणा सहाने यांना रूक्मिणी पुरस्काराने सन्मानित केले. तसेच कलादालनाची निर्मिती करणाऱ्या सुनीलकुमार लवटे, संजीव सपकाळ, अतुल डाके, संजय माने, प. ना. पोतदार, अशोक पाटील, संतोष चोरगे, सुधीर काटकर आदींचा सत्कारही यावेळी करण्यात आला.