ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

भंगारातील फ्रिजच्या टाकीचा स्फोट; ४ ठार

हिंगोली, दि. १९ (प्रतिनिधी) - वसमत तालुक्यातील हट्टा येथे शुक्रवारी सकाळी १० च्या सुमारास जनता गॅरेज या वेल्डिंगच्या दुकानात भंगारात निघालेल्या फ्रिजच्या टाकीचा भीषण स्फोट होऊन एकाच्या शरीराच्या अक्षरश: चिंध्या झाल्या. तर एका ९ वर्षीय मुलासह तिघांचे शरीर छिन्नविच्छिन्न झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. अन्य एक गंभीर जखमी आहे. दरम्यान, या स्फोटाची तीव्रता पाहता कारणांचा कसून शोध सुरू आहे.

शुक्रवारी सकाळी गुलाबमियाँ खां पठाण (वय ६५), त्यांचा मुलगा रहीम (वय ३०) गॅरेजमध्ये काम करत होता. हे दोघे व रहीमचा मुलगा अजीम (वय ९) व नातेवाईक शेख अतीक शेख इसाक (वय २८) हेदेखील दुकानात होते. भंगारातील फ्रिजमधील गॅसची टाकी कापून काढत असताना अचानक स्फोट चौघेही फेकले गेले. या वेळी दुकानाजवळ असलेले तानाजी हरिभाऊ जाधव (वय २५) गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.