ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

नाशिक येथे महावितरणची राज्यस्तरीय आढावा बैठक संपन्न

नाशिक, दि. २२ (प्रतिनीधी) - महावितरण कंपनीचे कार्यकारी संचालक (मानव संसाधन) नीलेश गटणे यांनी राज्यातील मानव संसाधन, कामगार आणि जनसंपर्क संवर्गातील सर्व उपव्यवस्थापक श्रेणीपर्यन्तच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक प्रशिक्षण व सुरक्षा केंद्र एकलहरे, नाशिक येथे नुकतीच घेतली. आतापर्यन्तच्या आढावा बैठक व प्रशिक्षण कार्यक्रमांपैकी या प्रशिक्षण केंद्रातील ही सर्वात मोठी आढावा बैठक होती. ग्राहकाला केंद्रस्थानी ठेऊन महावितरणची प्रतिमा उंचावण्यासाठी कर्मचाऱ्यांनी समर्पित भावनाने काम करावे, या उद्देशाने ही बैठक घेण्यात आली.

या बैठकीत प्रशासकीय कामकाज जलद गतीने व सुलभ व्हावे, दैनंदिन कामकाजातील अडचणी दूर व्हाव्यात, संगणक प्रणालीमध्ये कामे वेळेंत व्हावीत, कामात पारदर्शिपणा असावा, कर्मचाऱ्यांना कंपनीकडून मिळंणाऱ्या सुविधा विनाविलंब मिळांव्यात इत्यादिंवर भर देण्यात येऊन मार्गदर्शन करण्यात आले. विजेसारख्या अतिमहत्वाच्या क्षेत्रात अधिकारी व कर्मचारी काम करीत असल्याने त्याची मनोभावना सतत प्रेरित ठेऊन तो ग्राहकांना चांगल्या प्रतीची सेवा देईल यासाठी या प्रशिक्षणात तंज्ञाच्या मार्गदर्शनाखाली विविध विषयांवर व्याख्यान व कार्यशाळांही घेण्यात आल्या. अशा पध्दतीचे प्रशिक्षण कार्यक्रम सर्व राज्यभर राबवून कर्मचाऱ्यांची मानसिकता व मनोबल वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील, असा मनोदय कार्यकारी संचालक (मा.सं.) यांनी यावेळी व्यक्त केला.

दोन दिवसांच्या या प्रशिक्षण व आढावा सत्रामध्ये निवृत्त सहसचिव संत चौधरी यांचे शिस्तभंग कारवाई या विषयावर तर सायन्स्‌ ऑफ थॉटस्‌ अँड इमोशन्स या विषयावर अश्विनी मोने व मेडिक्लेम पॉलीसी संदर्भात पंकज परदेशी तसेच फायनान्शियल लिटरसी या विषयावर शैलेश चंदेल यांचे व्याख्यान झाले. मानव संसाधन व्यवस्थापन प्रणालीबाबत यावेळी संपूर्ण राज्याचा आढावा घेण्यात आला. उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी व जनसंपर्क अधिकारी यांच्याशी विविध विषयांवर चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले.

या बैठकीला मुख्यालयातील मुख्य महाव्यवस्थापक (मा.सं.) संदेश हाके, मुख्य महाव्यवस्थापक (तां.आस्था.) पुष्पा चव्हाण, नाशिक परिमंडलाचे मुख्य अभियंता दि.अ. कुमठेकर, महाव्यवस्थापक सुभाष कालेवाड, राजेंद्र पांडे हे प्रामुख्याने उपस्थित होते. नाशिक प्रशिक्षण केंद्राचे मुख्य महाव्यवस्थापक  के.व्ही. अजनाळंकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी या आढावा बैठकीच्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.