ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

राज्यात पाच लाख सौर कृषिपंपाचे वाटप करणार - उर्जामंत्री बावनकुळे

मुंबई, दि. २९ (प्रतिनीधी) - राज्यातील शेतकऱ्यांना अटल सौरकृषी पंप योजनेच्या माध्यमातुन पाच लाख सौर कृषिपंप देण्याची महत्वाकांक्षी योजना सुरु करण्यात आली आहे, अशी माहिती उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

महाराष्ट्र सरकारच्या सौरपंप योजनेची तुलना इतर राज्यांच्या सौरपंप योजनेशी केली जात होती. मात्र, इतर राज्यापेक्षा आपली योजना अधिक सक्षम आणि उपयुक्त आहे. राज्यातील अकोला, अमरावती, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ व वर्धा या आत्महत्याग्रस्त जिल्हयातील शेतकरी तसेच महाराष्ट्र शासनाच्या धडक सिंचन योजनेअंतर्गत विहीरीचा लाभ घेतलेले लाभार्थी, अतिदुर्गम भागातील शेतकरी, राज्यातील पारंपारीक पध्दतीने विद्युतीकरण न झालेल्या गावातील शेतकरी, विद्युतीकरणासाठी वनविभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र मिळत नसलेल्या भागातील शेतकरी व महावितरण कंपनीकडे पैसे भरून प्रलंबीत असलेल्या ग्राहकांपैकी ज्यांना तांत्रीक अडचणीमुळे नजीकच्या काळात वीज पुरवठा करणे शक्य नाही, अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार असल्याचेही उर्जामंत्री बावनकुळे यांनी सांगितले.
सौरपंपाचा फक्त पुरवठा करायचा नसून, त्यांची आदर्श मानकानुसार उभारणी करणे, तसेच पुढील पाच वर्ष सदर सौरपंप पूर्ण कार्यक्षमतेने कायमस्वरुपी कार्यान्वीत ठेवण्यासाठी सर्वसमावेशक देखभाल ठेवणे गरजेचे आहे. प्राथमिक टप्प्यात दहा हजार सौर कृषिपंप वाटपाची निवीदा प्रक्रिया पुर्ण केली. असून, या अंतर्गत जैन इरिगेशन या कंपनीला अधिकृत रित्या प्राधिकृत करण्यात आले आहे. 

सौर कृषिपंपा विषयी तक्रार करण्यासाठी टोल फ्री नंबर असणारे कॉल सेंटर, लाभार्थ्यांची तक्रार ४८ तासात निवारण न झाल्यास पहील्या तीन दिवसासाठी ५०० रुपये व त्यापुढील प्रत्येक दिवसास एक हजार इतका आकारले जाणार आहे. राज्याच्या सौरकृषिपंप योजनेचे योग्य पध्दतीने नियोजन व्हावे यासाठी राज्य रसकारन खबरदारी घेतली आहे.