ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

नाविन्यपूर्ण प्रकल्प राबविण्यावर मुक्त विद्यापीठाचा भर

अर्थसंकल्पात केली १८१ कोटींची तरतूद 
नाशिक, दि. ३० (प्रतिनीधी) - यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या सन २०१६-१७ च्या अर्थसंकल्पात विविध नाविन्यपूर्ण प्रकल्प राबविण्यासाठी तब्बल १८१ कोटींची भरीव तरतूद करण्यात आली आहे. त्यात विशेषतः पुण्यात कम्युनिटी कॉलेजचे बांधकाम करण्यासह तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण, कौशल्याधारित शिक्षण तसेच यशवंतराव चव्हाण आंतरराष्ट्रीय फेलोशिपही सुरु करण्यात येणार आहे.
   
मुक्त विद्यापीठाच्या व्यवस्थापन मंडळाची सभा कुलगुरू प्रा. डॉ. माणिकराव साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. त्यात सन २०१६-१७ च्या अंदाजपत्रकाबरोबरच पुढील शैक्षणिक वर्षात राबविण्यात येणाऱ्या विविध नाविन्यपूर्ण योजनांनाही तरतुदीसह मंजुरी देण्यात आली आहे. मुक्त विद्यापीठाद्वारे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचा वापर अधिकाधिक करण्याच्या उद्देशाने विद्यापीठाने गतवर्षीपासून परीक्षापद्धतीत लक्षणीय बदल केले आहेत. विशेष करून उत्तरपुस्तिकांवर विद्यार्थ्यांची छापील माहिती, विद्यापीठ मुख्यालयात उत्तरपुस्तिकांचे स्कॅनिंग यांसारख्या बाबी प्रत्यक्षात सुरु करण्यात आल्या. आता नवीन अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तसेच या केंद्रावर शेतीविषयक प्रयोग करून नंतर त्याचा वापर प्रत्यक्षात त्यांच्या शेतीमध्ये करून उत्पन्न व उत्पन्नाची साधने वाढविण्यासाठी टिशूकल्चर बायो-टेक्नोलॉजीचा वापर, फूड प्रोसेसिंग यासारख्या विषयांवर शेतकऱ्यांना शिक्षण व प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने ही केंद्रे स्थापन करण्यावर भर दिला जाणार आहे. याशिवाय अॅग्रीकल्चर टेक्नोलॉजी इन्क्युबेटर, बायो-टेक्नोलॉजी इन्क्युबेशन आणि टिशूकल्चर, पुण्यात कम्युनिटी कॉलेजचे बांधकाम करणे,  यशवंतराव चव्हाण आंतरराष्ट्रीय फेलोशिपही सुरु करणे आणि विद्यार्थ्यांना कौशल्याधारित शिक्षण देणे याबाबींवर विद्यापीठातर्फे आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. याबरोबरच व्हर्च्युअल क्लासरूम, कम्युनिटी रेडीओ सुरु करण्याबाबतही प्रयत्न केले जातील.
 
दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट अशा अस्मानी संकटांमुळे शेतकऱ्यांचे होणारे अतोनात नुकसान रोखण्यासाठी तसेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी विद्यापीठाच्या अमरावती विभागीय केंद्रावर कृषी संशोधन व प्रशिक्षण केंद्राची स्थापना करून शेती संशोधन, शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना सक्षम करण्याच्या उद्देशाने या संशोधन केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे. संगणक विद्याशाखेमार्फत कमवा व शिका योजनेअंतर्गत बीबीए हा तीन वर्षांचा शिक्षणक्रम पूर्ण करतानाच विद्यार्थ्यांनी विद्यापीठातील मुख्यालय तसेच विभागीय केंद्रांवर संगणकीय प्रणालीचे ज्ञान मिळवावे त्याकरीता त्यांना प्रथम वर्षासाठी प्रतिमहिना सात हजार, द्वितीय वर्षासाठी आठ हजार तर तृतीय वर्षासाठी नऊ हजार रुपये प्रशिक्षण विद्यावेतन देण्यासाठी तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली असून त्याअंतर्गत विद्यापीठ मुख्यालय तसेच विभागीय केंद्रांवर एकूण साठ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. त्याशिवाय कृषि विज्ञान केंद्र आणि आरोग्य विज्ञान विद्याशाखेमार्फतही कमवा व शिका योजना राबविण्यात येत आहे.
 
विद्यार्थी, केंद्र संयोजक, समंत्रक यांच्या बैठका, कामकाज, चर्चासत्रे, व्याख्याने, प्रशिक्षण, केंद्रीय मूल्यमापन कार्यक्रम इत्यादी कामांसाठी प्रशस्त इमारत बांधण्यासाठी तरतूद करण्यात आलेली आहे. तसेच एशियन असोसिएशन ऑफ ओपन युनिव्हर्सिटीच्या सहकार्यानेच सन २०१८ मध्ये कार्यशाळा आयोजित करण्यात येणार असल्याचे यावेळी निश्चित करण्यात आले. विद्यापीठात कार्यरत असलेल्या नियमित सेवेतील कर्मचाऱ्यांच्या त्रुटींच्या संदर्भात निवृत्ती वेतनाबाबत राज्य शासनास माहिती सादर करण्यास मंजुरी देण्यात आली. या बैठकीस प्रा. डॉ. कपिलकुमार, प्रा. व्ही. एल. माहेश्वरी, ज्ञानदेव नाठे, उल्हास गवळी, प्रफुल्ल वाकडे, एस. ए. ठोंबरे आणि कुलसचिव डॉ. प्रकाश अतकरे आदी उपस्थित होते.