ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

सहा जहाल माओवाद्यांची शरणागती

गडचिरोली, दि. ७ (प्रतिनिधी) - नक्षल चळवळीतील दर्रेकसा दलम एरिया कमिटी सदस्यासह सहा जहाल माओवाद्यांनी जिल्हा पोलिसांपुढे शरणागती पत्करली. या सर्वांचा विविध गुन्ह्यांत सहभाग असून त्यांनी अनेक हिंसक घटना घडवून आणल्या आहेत. 

एरिया कमिटी सदस्य मानू ऊर्फ सुखदेव चैतू कोडापे याच्यावर सहा लाखांचे तर उर्वरित पाच माओवाद्यांवर प्रत्येकी दोन लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.

सहा जहाल माओवादी शरण आल्याने गडचिरोली जिल्ह्यात नक्षल चळवळीला जबर धक्‍का बसला आहे. महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे गडचिरोली जिल्ह्यातील माओवादी मोठ्या संख्येने शरण येत आहेत. नक्षलविरोधी अभियानासोबतच समाजजागृती, नक्षल आत्मसमर्पण योजनेची माहिती सामान्यांपर्यंत तसेच नक्षल्यांपर्यंत पोचविण्यात पोलिसांना यश आले.