ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

मुलीचा प्रेमाला नकार तरुणाने पेटवली रिक्षा

तरुणाचा स्वत:लाही जाळण्याचा प्रयत्न
नाशिक, दि. १६ (प्रतिनिधी)  - एकतर्फी प्रेमातून एका मजनूने स्वत:ची अॅपेरिक्षा पेटवून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना  सटाणा बसस्थानकाजवळील विंचुर-प्रकाशा राज्यमार्गावर घडली. मजनुने केलेल्या या थरार नाट्यामुळे परिसरात खळबळ उडाली. त्याला मुलीचे प्रेमतर मिळालेच नाही परंतु पोलीस कोठडी मात्र मिळाली.

वैभवचे एका मुलीवर एकतर्फी प्रेम होते. पण, संबधीत मुलीने त्याला अनेकदा नकार दिला. संबधीत तरुणीच्या नातेवाईकांनी वैभवला १४ एप्रिल रोजी चांगलाच चोप दिला होता. त्यामुळे एकतर्फी प्रेमाच्या नैराश्येतून वैभवने  बसस्थानकासमोरच स्वत:चा अॅपे रिक्षा पेटवून स्वत:वरही रॉकेल टाकत  आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते शाम बगडाणे व इतर काही नागरिकांनी प्रसंगावधान राखून पेटत्या रिक्षाकडे जाणार्‍या चालकास दूर केले. त्यानंतर वैभवला सटाणा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वैद्यकिय अधिक्षक डॉ. एस.आर. राठोड, डॉ. शशिकांत कापडणीस यांनी प्रथमोपचार करुन त्यास अधिक उपचारासाठी मालेगावी येथे हलविले. 

वैभवने बसस्थानकासमोरील चौकात स्वत:ची रिक्षा रॉकेल टाकून पेटवून दिल्याने बसस्थानकासमोर काही काळ थरारक वातावरण होते. अचानक घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली. बसस्थानक परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती, तर रस्त्यावर रिक्षाचा भडका उडाल्याने स्फोट होईल, असे वाटल्याने घबराट पसरली होती. तर काही काळासाठी रस्त्यावरील वाहतूकही ठप्प झाली होती. 

याप्रकरणी पोलिसांनी वैभवसह चौघांविरुद्ध भादंवि कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे हे अधिक तपास करीत आहेत.