ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

धुळे जिल्हा बँकेच्या इमारतीला आग

धुळे, दि. १७ (प्रतिनिधी) - धुळे आणि नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती बँकेला लागलेल्या आगीत बँकेचे संपुर्ण कार्यालय जळून खाक झाले आहे. ही घटना आज सकाळी आठच्या सुमारास घडली. ही आग कशामुळे लागली हे अद्याप समजू शकले नाही. बँकेला लागलेली आग लावण्यात आल्याची चर्चा सध्या नागरीकांमध्ये आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी फिरावयास जाणार्‍या तरुणांना धूर येत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर ही माहिती त्यांनी अग्निशमन दलाला दिली. त्यानुसार, मनपाचे अग्निशमन दलाचे पथक बँकेजवळ पोहोचले. खिडकीमधुन पाण्याचा मारा करण्यात आला. मात्र आग इतकी भीषण होती की सुमारे चार तास आग विझवण्याचे प्रयत्न करुनही आग नियंत्रणात आली नाही. इमारतीच्या वरच्या मजल्यापर्यंत पोहोचणे अग्निशमन दलाच्या जवानांना कठीण होत आहे.    धुळ्यासह मालेगाव, अरळनेर, पारोळा येथून अग्निशमन दलाच्या गाड्यांना पाचारण करण्यात आले आहे. सुमारे ३० बंब वापरुनदेखील आग आटोक्यात आली नाही. आज रविवार असल्याने बँक परिसरात शुकशुकाट होता. त्यामुळे ही आग जास्त वेळ धुमसत होती.    बँकेच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर चेअरमन, व्यवस्थापकीय संचालक आणि कार्यालयीन अधिकार्‍यांची केबिन आहे. हा मजला पूर्णपणे जळून खाक झाला आहे. या आगीमध्ये महत्त्वाची कागदपत्रे नष्ट झाली आहेत.    

बँकेच्या गैरव्यवहाराच्या आरोपासंदर्भात अनेक महत्त्वाची कागदपत्रे याच मजल्यावर ठेवण्यात आली आहेत. तेही पूर्णपणे नष्ट झाली आहेत. त्यामुळे शहरात चर्चेला उधाण आले आहे. याबद्‍दल बँकेच्या व्यवस्थापकांनी कोणताही खुलासा केलेला नाही.