ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

शंभर रुपयांसाठी दोघांचा दगडाने ठेचून खून

नागपूर, दि. २१ (प्रतिनिधी)  – जेवण करायला 100 रुपये दिले नाही म्हणून एका माथेफिरूने दोन जणांचा दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना नागपूरच्या वाडी परिसरात घडली आहे. 

ज्ञानेश्नर राठोड असं 24 वर्षीय आरोपीचं नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

नागपूरच्या वाडी परिसरात सकाळी मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. या घटनेचा तपास केल्यानंतर नागपूर पोलिसांनी ज्ञानेश्वर राठोड या व्यक्तीनेच या दोन जणांचा खून केल्याचा उघड झालं आहे. बुधवारी रात्री जेवण करण्यासाठी ज्ञानेश्वरने रस्त्यावर उभ्या असलेल्या श्याम खाडे आणि ओम गिरी या दोन जणांना जेवण करण्यासाठी १०० रुपये मागितले होते. या दोघांनी ज्ञानेश्वरला पैसे देण्यास नकार दिल्याने त्याने या दोघांचाही दगडाने ठेचून खून केला. नागपुरातील गेल्या ४८ तासांतील शुल्लक कारणावरून खून झाल्याची ही दुसरी घटना आहे.