ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

आंबेडकरांचे विचार कृतीत उतरविण्याची गरज - डॉ. विनय सहस्रबुद्धे

नाशिक, दि. २१ (प्रतिनिधी) - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार विश्व समग्र होते. घटनेचे शिल्पकार आणि दलितांचे कैवारी यांच्या पुरतेच त्यांना सीमित ठेवण्यात आले. पाणी, उर्जा, जलमार्ग, कृषी, आर्थिक, पर्यावरण, सामाजिक न्याय, राष्ट्रवाद अशा विविध विषयांवर त्यांनी पहिल्यांदाच मुलभूत विचार मांडले. त्यामुळे त्यांचे समग्र विचार कृतीत उतरवून स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मुलतत्वे मनातून प्रत्यक्ष कृतीत उतरणार नाही तोपर्यंत सामाजिक न्यायाची संकल्पना प्रत्यक्षात येणार नाही असे उदगार भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी आज नाशिक येथे बोलताना काढले.  
 
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि समकालीन प्रश्न’ या विषयावर तीन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उदघाटन डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरु प्रा. डॉ. माणिकराव साळुंखे हे होते. यावेळी व्यासपीठावर ख्यातनाम दिग्दर्शक जब्बार पटेल, स्वामी रामानंद्तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर, ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे, विजय, जाधव, कुलसचिव डॉ. प्रकाश अतकरे उपस्थित होते.
 
डॉ. विनय सहस्रबुद्धे पुढे म्हणाले, देशाचे ऐक्य संस्कृतीतून निर्माण झाले. सध्या सर्वत्र कृत्रिम भेद निर्माण केले जात आहेत. समाजाची आकांक्षा जागवणे व त्याची प्रतिपूर्ती करणे महत्त्वाचे आहे. ग्रामीण जीवनाच्या उदात्तीकारणातून प्रश्न सुटणार नाहीत. कुलगुरू प्रा. डॉ. माणिकराव साळुंखे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना सांगितले, डॉ. आंबेडकर यांनी भारताच्या आर्थिक व्यवस्थेचे मूलगामी चिंतन केले. त्यांनी विद्यापीठ स्तरावर बौद्धिक आणि व्यावसायिक स्तरावर मिळवलेले यश त्यांच्या कठोर मेहनतीतूनच मिळवले होते.  त्यांनी जन्मभर समाजातील वंचित, शोषित, पिडीत घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले तेच काम गेल्या २६ वर्षांपासून मुक्त विद्यापीठ करीत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच विद्यापीठाच्या प्रगतीचा आढावा सादर केला. मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून आजपर्यंत सुमारे ५० लाख वंचितांना उच्च शिक्षणाच्या प्रवाहात आणले.  
 
यावेळी प्रा. प्रवीण घोडेस्वार यांनी संपादित केलेल्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि समकालीन प्रश्न’ या ग्रंथाचे प्रकाशन डॉ. विनय सहस्रबुद्धे आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण व बहि:शाल विभागाच्यावतीने दिला जाणारा शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख स्मृति पुरस्कार नांदेड येथील स्वामी रामानंद्तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. पंडित विद्यासागर यांना सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ आणि रोख रुपये २१ हजार देवून डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्या हस्ते देवून गौरविण्यात आले. तर जालना येथील ग्रामीण साहित्यिक विजय जाधव यांच्या ‘दाखला’ या कथालेखानास  बाबुराव बागुल कथालेखक पुरस्कार सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ आणि रोख रुपये २१ हजार देवून दिग्दर्शक जब्बार पटेल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.  डॉ. पंडित विद्यासागर आणि विजय जाधव या पुरस्कारार्थींनीही सत्काराला उत्तर देताना कृतज्ञता व्यक्त केली. मुक्त विद्यापीठाने दिलेल्या पुरस्कारामुळे आमचे बळ वाढले असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
 
 
ओबीसींना आरक्षण देण्याची तरतूद आंबेडकरांनी केली - हरी नरके
दुपारच्या सत्रात ‘इतर मागासवर्गीयांसाठी डॉ. आंबेडकरांचे योगदान’ या विषयावर परिसंवाद झाला.  यात ज्येष्ठ विचारवंत हरी नरके प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. बाबासाहेबांनी मुंबई विधिमंडळात असताना १९३० साली स्टार्ट समितीच्या माध्यमातून इतर मागास प्रवर्ग निर्माण करण्याची प्रक्रिया सुरु केली. पुढे त्यांनी क्षुद्र पूर्वी कोण होते हा ग्रंथ ओबीसी च्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी लिहिला. त्यात ओबीसी ची स्वतंत्र जनगणना करण्याची मागणी केली. आज ती जनगणना चालू असून ओबीसीच्या आजच्या सर्व चळवळींना डॉ. आंबेडकरांचे विचार आणि उर्जा देत आहेत. पुढे १९५१ मध्ये केंद्रीय कायदेमंत्री पदाचा राजीनामा देताना आपल्या राजीनाम्याचे दुसरे कारण ओबीसीना आरक्षण मिळाले नाही म्हणून आपण केंद्रीय कायदेमंत्री पदाचा राजीनामा देत असल्याचे नमूद केल्याचे ते म्हणाले. भारतीय राज्याघातानेच्या ३४० व्या कलमान्वये ओबीसींना सामाजिक न्यायासाठी आरक्षण देण्याची तरतूद केल्याचेही नरके यांनी शेवटी सांगितले.