ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

विदर्भाच्या नकाशासह झेंडाही तयार

नागपूर, दि. २९ (प्रतिनिधी) - आधी वाढदिवसानिमित्त केकमधून विदर्भाच्या तुकडा कापणाऱ्या श्रीहरी अणेंनी आता वेगळ्या विदर्भाचा नकाशा आणि झेंडाही तयार केला आहे. केसरी, हिरवा, काळा, निळा, पांढरा आणि अखेरीस पट्टेरी वाघाचा रंग असे एकूण सहा रंग या झेंड्याला आहेत.

प्रत्येक जिल्ह्याला नकाशात वेगवेगळ्या रंगात दाखवलं गेलं आहे. आज आगामी महाराष्ट्र दिनाच्या पाश्वभूमीवर श्रीहरी अणे आणि विदर्भवाद्यांनी नागपुरात बैठक घेतली.

केसरी रंग  संत्र्याचा, पांढरा रंग कापसाचा, हिरवा रंग वनाचा, निळा रंग खनिज आणि विजेचा, काळा रंग कोळशाचा, तर अखेरीस पट्टेरी वाघांचा रंग आहे.
यावेळी येणारा ‘महाराष्ट्र दिन’ हा ‘काळा दिन’ म्हणून साजरा करु, असंही अणे म्हणाले. या बैठकीत महाराष्ट्र दिनाला विरोध कसा करायचा, त्याशिवाय वर्षभर विदर्भ आंदोलनाची काय दिशा ठरवायची, याबाबत चर्चा झाली. यावेळी स्वतंत्र बुंदेलखंडची मागणी करणारे आंदोलकही नागपुरात अणेंसोबत हजर होते.