ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

मुक्त विद्यापीठाचे विविध पुरस्कार जाहीर; १० मे रोजी होणार वितरण

कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार डॉ. विष्णु खरे यांना
नाशिक दि. २ (प्रतिनिधी) - यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुसुमाग्रज अध्यासनाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणा विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. डॉ. माणिकराव साळुंखे यांनी आज नाशिक येथे केली. त्यात अत्यंत मानाचा समजला जाणारा २०१६ चा कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार यंदा छिंदवाडा (मध्यप्रदेश) येथील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. विष्णु खरे यांना,  अमरावतीच्या सामाजिक कार्यकर्त्या रजिया सुलताना यांना श्रमसेवा आणि ज्ञानदीप पुरस्कारासाठी नाशिकच्या सौ. हेमलता बिडकर यांचा समावेश आहे. येत्या मंगळवारी (दि.१०) मे रोजी विद्यापीठाच्या नाशिक येथील मुख्यालयात दुपारी ३ वाजता हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

साहित्य, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिलेल्या व्यक्तींना विविध पुरस्कार देऊन मुक्त विद्यापीठातर्फे गौरविण्यात येते. डॉ. विष्णु खरे यांचे इंग्रजी आणि हिंदी भाषेतील साहित्यात मोठे योगदान आहे. अनुवादक, समीक्षक, चित्रपट आलोचक, चित्रपट संवाद लेखक, हिंदी कवी कादंबरीकार म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांचे इंग्रजी व हिंदी ह्या भाषेत चौफेर लेखन केलेले असून अनेक पुस्तके व ग्रंथ संपादित केले आहेत. जगभरातील अनेक प्रसिद्ध कवींचा कवितासंग्रह व त्यांचा अनुवाद करण्याचे महत्त्वाचे कार्य त्यांनी केलेले आहे. ‘खुद अपनी आँख से’, ‘पिछला बाकी’, ‘विष्णु खरे की बीस कविताएँ’, ‘लाल टेन जलाना’, ‘पाठांतर कविताएँ’, ‘सबकी आवाज के परदे मे’, ‘काल और अवधी के दरमियान’ इ. हिंदी भाषेतील पुस्तके नावाजलेली आहेत. तसेच त्यांची अनेक संपादित पुस्तके आणि ग्रंथ लिहिलेली सिने समिक्षा आहेत.
 
त्यांना देण्यात येणार्‍या या पुरस्काराचे स्वरूप एक लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे आहे. हा सातवा कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार असून यापूर्वी नागालॅँडच्या ज्येष्ठ साहित्यिक तेमसुला आओ, पंजाबी साहित्यिक डॉ. सुरजित पातर, गुजराथी सीतांशू यशश्चंद्र, कन्नड भाषेतील कवी जयंत कैकीनी, हिंदीतील ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत देवताले आणि मल्याळी साहित्यिक डॉ. के सच्चिदानंदन या साहित्यिकांना सन्मानित करण्यात आले आहे.
 
याबरोबरच विद्यापीठातर्फे दिला जाणारा सन २०१५ चा श्रमसेवा पुरस्कार अमरावतीच्या सामाजिक कार्यकर्त्या रजिया सुलताना यांना जाहिर करण्यात आला आहे. आपल्या व्रत व सेवेने उपेक्षित वर्गातल्या महिलांची उन्नती करणाऱ्या महिलेला किंवा महिलेच्या संस्थेला हा पुरस्कार दिला जातो. रजिया सुलताना ह्या मुक्त पत्रकार व मुक्त कार्यकर्त्या आहेत. समाजात उपेक्षित वारांगना, कैदी, तृतीयपंथीय अशा घटकांसाठी कार्य, स्त्रीयांच्या प्रश्नांना वाचा फोडणारी कवयित्री, लेखिका, प्रतिभा संपन्न सामाजिक कार्यकर्त्या म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. त्याचप्रमाणे देवदासी, महिला कैदी, मनोरुग्ण, एड्स्‌बाधित, निराधार, व अपंग महिलांशी संबंधीत सामाजिक कार्य तसेच महिलांचे पुनर्रवसन, महिलांच्या बेवारस प्रेतांचा स्मशानातील दफनविधी करणे यासारखी कामे केली आहेत. तर ज्ञानदिप पुरस्कार २०१५ हा दूरशिक्षण क्षेत्रातील कार्य करणाऱ्या व्यक्तिला देण्यात आलेला आहे. नाशिकच्या सौ. हेमलता विजय बिडकर यांना जाहीर करण्यात आलेला आहे. सौ. बिडकर ह्या गेल्या ४१ वर्षांपासून डांग सेवा मंडळाची धुरा यशस्वीपणे सांभाळत आहेत. ग्रामीण व आदिवासी समाजाला शिक्षणाच्या संधी मिळाव्यात म्हणून आश्रमशाळा सुरु करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. त्याचप्रमाणे विविध शैक्षणिक संस्थांमधील महिलांसाठी विशेष कार्य, अंधश्रध्दा निर्मुलन, महिलांचे आजार, व्यंधत्व, बालविवाह प्रतिबंध, व्यसनमुक्ती, व्यवसाय मार्गदर्शन, जनजागृतीचे कार्य केले आहे. शिवाय अनेक सामाजिक प्रश्नांवर लेखन व शैक्षणिक संस्थांमध्ये आदिवासी समाजासाठी उल्लेखनीय कार्य केलेले आहे. राज्यस्तरीय परिचारिका संघटनेच्या अध्यक्षा म्हणूनही त्या कार्यरत आहेत. दोन्ही पुरस्कारांसाठी प्रत्येकी रु. २१ हजार रोख, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
 
मंगळवार दि. १० मे २०१६ रोजी मुक्त विद्यापीठाच्या शैक्षणिक इमारतीत दुपारी तीन वाजता पुरस्कार वितरणाचा सोहळा होणार आहे. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून वनाधिपती विनायकदादा पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे अवाहन प्रभारी कुलसचिव पंडित गवळी, विद्यार्थी कल्याण व बहि:शाल शिक्षण सेवा केंद्राच्या प्रमुख डॉ. विजया पाटील यांनी केले आहे.