ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा ११ मे पासून सुरु

नाशिक, दि. ५ (प्रतिनिधी) - यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध शिक्षणक्रमाच्या परीक्षा बुधवार दि. ११ मे पासून राज्यभरात सुरु होत आहेत. महाराष्ट्रातील ७४९ परीक्षा केंद्रांवर बी.ए., बी.कॉम व अन्य शिक्षणक्रमांच्या अंतिम लेखी परीक्षा शुक्रवार दि. ११ मे पासून संपूर्ण महाराष्ट्रात सुरु होत आहेत. जवळपास ६ लाख १० हजार विद्यार्थी परीक्षेस बसणार आहेत. 

विद्यापीठ यावर्षी प्रथमच सर्व शिक्षणक्रमांची परीक्षा प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबवित असल्याने परीक्षेतील गैरप्रकारांना आळा बसणार आहे. ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेणारे हे भारतातील पहिलेच विद्यापीठ आहे.
 
संपूर्ण राज्य कार्यक्षेत्र असलेल्या मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा दि. ११ ते २७ मे २०१६ दरम्यान होत आहेत. आजवर विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर पाठविण्यात येणाऱ्या प्रश्नपत्रिका पाकिटाद्वारे पाठविण्यात येत होत्या. आता तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून ह्या प्रश्नपत्रिका ऑनलाइन पद्धतीने परीक्षेपूर्वी काही वेळ आधी पाठविण्यात येतील. तसेच जेवढे परीक्षार्थी आहेत. तेवढ्याच उत्तरपुस्तिका असणार आहेत. विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या उत्तरपुस्तिकांवर परीक्षार्थींची परीक्षेसंदर्भातील संपूर्ण माहिती छापील असून त्याला बारकोड असणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ वाया न जाता त्यांना थेट उत्तरे लिहिता येतील. बी.ए., बी.कॉम. (मराठी / इंग्रजी /उर्दू / हिंदी माध्यम), बी.ए. ग्राहक सेवा, एम. कॉम., बी. एस्सी. एम. एल. टी., बी. एस्सी. ऑप्टोमेटरी, बी. लिब., एम. ए. शिक्षणशास्त्र, डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट, बी. एस्सी. हॉटेल अॅन्ड टुरिझम मॅनेजमेंट, बी. एस्सी. हॉस्पिटॅलिटी अॅन्ड टुरिझम स्टडीज, बी. एस्सी. इन हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट अॅन्ड कॅटरिंग ऑपरेशन, बी. एस्सी. इन हॉस्पिटॅलिटी स्टडीज अॅन्ड केटरिंग सर्व्हिसेस, सहकार व्यवस्थापन पदविका, आरोग्यमित्र, रुग्णसहायक, डोटा, योगा शिक्षक, बालविकास सेविका, गांधी विचार दर्शन, बी.एस्सी. (इंडस्ट्रीयल ड्रग्ज सायन्स), बी.एस्सी. (इंडस्ट्रीयल सायन्स) तसेच बी. एस्सी. (ड्रग सायन्स), बी.ए. (पब्लिक सर्व्हिसेस) व एम.ए. (पब्लिक सर्व्हिसेस), सहकार व्यवस्थापन पदविका (दुग्धव्यवसाय /बँकिंग / सहकारी / कृषी व्यवसाय), एम. कॉम., एम. ए., एम. एस्सी. (विषय संप्रेषण), बी. एड., एम. एड., बी. ए. जनसंज्ञापन व वृत्तपत्रविद्या इत्यादी पदवी / पदविका व प्रमाणपत्र या शिक्षणक्रमांच्या परीक्षा सुरु होत आहेत.
 
यापैकी बी.ए.,बी.कॉम. या शिक्षणक्रमांच्या परीक्षा दि. २७ मे पर्यंत सुरु राहणार आहेत. वरील सर्व विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र त्यांना देण्यात आलेल्या परीक्षा केंद्रावर उपलब्ध आहे. याशिवाय http://ycmou.digitaluniversity.ac संकेतस्थळावरील ‘हॉल तिकीट’ लिंकवर ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांना डाऊनलोड करून घेता येईल. विद्यार्थ्यांना काही शंका / अडचण, परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेशपत्र याबाबी संकेतस्थळावरून डाऊनलोड करून घ्याव्यात. विद्यार्थांना काही शंका अडचण उदभवल्यास त्यांनी प्रथम आपल्या अभ्यासकेंद्राशी संपर्क साधावा, त्याठिकाणी समाधान न झाल्यास विभागीय केंद्राशी संपर्क करावा व गरज भासल्यास विद्यापीठाच्या नाशिक येथील मुख्यालयातील परीक्षा विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन परीक्षा नियंत्रक डॉ. अर्जुन घाटुळे यांनी केले आहे.