ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

नरखेड तालुक्यात अवकाळी पावसामुळे नागरिकांची तारांबळ

घरांच्या भिंती ढासळल्या; छत्रे उडाले; झाडे उन्मळून पडली
जलालखेडा, दि. 20 (प्रतिनिधी)- नरखेड तालुक्यातील लोहारीसावंगा व मेंढला परिसरात गुरुवारी अवकाळी पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास जोरदार वादळाला सुरुवात झाली. त्यातच या वादळामुळे नागरिकांच्या घरांच्या मातीच्या भिंती कोसळल्या तर अनेकांच्या घरांवरील पत्र्यांचे छत उडाले. विजेच्या तारा तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता, तर झाडे उन्मळून पडल्याने भारसिंगी - लोहारीसावंगा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
नरखेड तालुक्यातील खापा (घुडण), जामगाव (बु), घोगरा, जामगाव (फाटा), लोहारा, लोहारीसावंगा, रानवाडी, मायवाडी तसेच मेंढला परिसरातील मेंढला, उमठा, वडविहिरा, दातेवाडी, वाढोणा, रामठी, सिंजर, पिंपळदरा, साखरखेडा, दावसा, बानोर (चंद्र) यासह अन्य गावांमध्ये गुरुवारी सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास वादळाला सुरुवात झाली. या सर्वाधिक नुकसान खापा (घुडण) येथील नागरिकांचे झाले. खापा (घुडण) येथे एकूण 375 घरांपैकी 190 घरांची अंशत: नुकसान झाले. यातील काही घरांच्या मातीच्या भिंती कोसळल्या असून, काही घरांवरील छत उडाले. सुदैवाने यात कुणीही जखमी झाले नाही. सोबतच मेंढला परिसरातील गावांमधील काही नागरिकांच्या मालमत्तेचे अंशत: नुकसान झाले. जलालखेडा व भारसिंगीसह परिसरात सोसाट्याच्या वार्‍यासह पावसाच्या सरी कोसळल्या.