ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

एकतर्फी प्रेमातून हत्या : भरदिवसा अल्पवयीन मुलीवर केले चाकूने वार

यवतमाळ - एकतर्फी प्रेम प्रकरणातून एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीस भरदिवसा वाटेत अडवून तिच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आला. ही घटना शुक्रवारी सकाळी ९ वाजता उज्ज्वलनगर परिसरात घडली. गंभीर जखमी झालेल्या त्या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

ही मुलगी लोहारा येथील देवीनगर भागात मामांकडे वास्तव्यास होती. ती जवाहर कन्या शाळा, लोहारा येथे अकरावीत शिकत होती. शुक्रवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे उज्ज्वलनगर परिसरातील पल्लवी कॉम्प्युटर येथे संगणकाच्या क्लाससाठी गेली होती. क्लास आटोपून घराकडे येत असताना आरोपी ओमप्रकाश याने तिची सायकल थांबवून चाकूने हल्ला केला. तिच्या पोटात भोसकून हातावरही वार केले. त्यानंतर ओमप्रकाश घटनास्थळावरून पसार झाला. या वेळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मुलीस तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तिची प्रकृती अत्यवस्थ असल्याने शस्त्रक्रियाही करण्यात आली. मात्र, अतिरक्तस्रावामुळे उपचारादरम्यान शुक्रवारी सायंकाळी तिचा मृत्यू झाला.